नवीन पीएमओ सेवा तिर्थमध्ये Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय (Union Cabinet) मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आणि या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की युगाब्द 5127, विक्रम संवत 2082, फाल्गुन शुक्ल अष्टमीच्या दिवशी नवनिर्मित सेवा तिर्थमध्ये कॅबिनेटची पहिली बैठक झाली असून देशहिताचे अनेक अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत ‘केरळ’ राज्याचे नाव अधिकृतपणे ‘केरलम’ करण्याच्या (Union Cabinet) प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच श्रीनगरमध्ये नवीन इंटीग्रेटेड एअरपोर्ट टर्मिनल उभारण्याच्या प्रकल्पालाही हिरवा कंदील दाखवण्यात आला. याशिवाय गोंदिया ते जबलपूर रेल्वे मार्गिकेचे दुपदरीकरण, घमरिया ते झारखंडमधील चांडिलपर्यंत तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका, अहमदाबाद मेट्रोचा विस्तार आणि कच्च्या ज्यूटच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ असे अनेक निर्णय घेण्यात आले.

केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw यांनी (Union Cabinet) पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने पहिल्या तीन कार्यकाळात विकासाला वेग दिला असून आज घेतलेले निर्णयही देशाच्या प्रगतीला चालना देणारे आहेत. कच्च्या ज्यूटचा एमएसपी वाढवून 5,925 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने नेहमीच उत्पादन खर्चापेक्षा किमान 50 टक्के अधिक दर देण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

पॉवर सेक्टरमध्येही मोठ्या सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत (Union Cabinet) ग्रिडमध्ये मोठी गुंतवणूक झाल्यामुळे भारताचा वीज ग्रिड जगातील सर्वात मजबूत ग्रिडपैकी एक मानला जातो, असे वैष्णव यांनी नमूद केले. श्रीनगर विमानतळाच्या नव्या इंटीग्रेटेड टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ सुमारे 71 हजार चौरस मीटर असेल, तर सध्याचे टर्मिनल 20 हजार चौरस मीटर क्षेत्रात आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

रेल्वे पायाभूत सुविधांबाबत बोलताना (Union Cabinet) त्यांनी सांगितले की पुनारख-किऊल तिसरी आणि चौथी मार्गिका प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण केला जाईल. या कामासाठी अत्यल्प जमीन अधिग्रहण करण्यात येणार असून 14 अत्यावश्यक पूल, 18 मोठे पूल आणि 62 लहान पूल बांधण्यात येणार आहेत. या सर्व निर्णयांमुळे देशातील पायाभूत सुविधा, शेती आणि वाहतूक क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे.

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *