अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची सूत्र नेमकी कोणाच्या हाती जाणार?(Candidate)याकडे लक्ष लागलेलं असताना राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत निर्णय झालाय. बारामतीची धुरा कोणाकडे जाणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून…गेल्या तीन दशकांपासून बारामती आणि अजित पवार हे राज्याच्या राजकारणातलं रूळलेलं समीकरण. बारामतीचा विकास आणि ‘शब्द दिला की तो पाळणारच’ ही दादांची ओळख बारामतीकरांनी जवळून अनुभवली. मात्र अजितदादांच्या अकाली एक्झिटनं बारामतीचा ‘कारभारी’ हरपला आणि संपूर्ण तालुक्यात पोरकेपणाची भावना निर्माण झाली.

नियतीचा घाव सोसून आता त्याच बारामतीला पुन्हा उभं करण्यासाठी (Candidate) पवार कुटुंबिय पुढे सरसावलयं. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालयं. बारामतीचा हा नवा ‘पॉवर’ प्लॅन नेमका कसा असणार आहे? पाहुयात…बारामती विधानसभेची पोटनिवडणुक सुनेत्रा पवार लढवणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाला. पार्थ पवार राज्यसभेवर जाण्याची चर्चा होत आहे. २६ फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची घोषणा होणार आहे. सुनेत्रा पवारांची ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.

अजितदादांच्या निधनानंतर पक्षातील कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सुनेत्रा पवारांनी (Candidate) उपमुख्यमंत्री पद स्विकारलं. मात्र उपमुख्यंत्री पद कायम ठेवण्यासाठी 6 महिन्याच्या आत निवडून येणं गरजेच आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवार बारामतीच्या आखाड्यात उतरणार आहेत. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीचा भर ही निवडणुक बिनविरोध करण्यावर आहे. बारामती हा अजितदादांचा अभेद्य गड मानला जातो. आता सुनेत्रा पवारांना विधानसभेत पाठवून बारामतीतला ‘पवार’ नावाचा दबदबा कायम ठेवला जाईल.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *