सोशल मीडियाच्या जगात दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात.(Couple’s) यापैकी काही व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित करतात तर काहींमुळे वादही निर्माण होतात. सध्या अशाच एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलीये. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी बाइकवर अत्यंत विचित्र आणि धोकादायक पद्धतीने बसलेले दिसतायत.विशेष म्हणजे, या विचित्र पोझमध्ये असतानाच तरुण रस्त्यावर बाइक चालवताना दिसतोय. ज्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली असून हे चुकीचं असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.(Couple’s) व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यामुळे अनेकांचं लक्ष वेधलंय. हजारो लोकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. रस्त्यावरच्या वाहतुकीदरम्यान असा स्टंट केल्याने अपघाताचा धोका वाढू शकतो, असं मत काहींनी व्यक्ती केलंय.व्हिडिओमध्ये तरुण-तरुणी बाइकवर एकमेकांकडे तोंड करून बसलेले दिसतात. हा प्रकार पाहून अनेकांना आश्चर्य वाटलंय, तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली. या व्हिडीओमध्ये सिग्नलवर एक बाईकवर तरूण बसलाय.
त्याच्या अगदी चेहऱ्याच्या समोर एक तरूणी बसलेली दिसतेय. (Couple’s) बाईक थांबलेली असताना तरूणीने त्याला मीठी मारल्याचंही दिसतंय. त्यानंतर तो तरूण पुन्हा बाईक सुरु करून निघून जातात.हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर आपलं मत नोंदवलंय. यावेळी एका युजरने त्यांची मजा घेत म्हटलंय की, प्यार के दिवाने…तर अजून एका युजरने कमेंट करत म्हटलंय की, हे कृत्य चुकीचं असून यांनी पोलिसांनी अटक केली पाहिजे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!