इचलकरंजी येथीलमनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दाफाउंडेशन, (fortune) रोटरी क्लब ऑफइचलकरंजी सेंट्रल आणि अखिलभारतीय मराठी नाट्य परिषदइचलकरंजी शाखा यांच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजजन्मदिन-मराठी भाषा गौरव दिनानिमित्तदिनांक २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ यादिवशी मराठी दिन महोत्सवाचे आयोजनकरण्यात आले आहे. उपक्रमाच्यापहिल्या दिवशी गुरुवार दि. २६ फेब्रुवारीरोजी रात्री ९.१५ वाजता दोन एकांकिकासादर होणार आहेत. यामध्ये देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेजऑफ कॉमर्स,कोल्हापूर प्रस्तुत ‘ग्वाही’ हीउत्कंठावर्धक एकांकिका आणि सोहनप्रॉडक्शन कोल्हापूर निर्मित ‘घरघर’ हीकौटुंबिक विनोदी एकांकिका होणारआहे. युवा कलाकारांच्या संचातील यादोन्ही एकांकिकांनी महाराष्ट्रातील विविधठिकाणी अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत.

समारोपाच्या दिवशी शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ वाजता (fortune) हिमशिखा पुणे प्रस्तुत ‘किर्तावणी’ वारी आडवाटंच्या विठोबाची हा कीर्तन आणि लावणी या लोककला प्रकारांचा धांडोळा घेणारा संगीतमय प्रवास दाखविणारा आशयपूर्ण कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद इचलकरंजी शाखा आणि मनोरंजन वाचनालय यांचे सहकार्य लाभले आहे. सदरचे सर्व कार्यक्रम येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. नागरीक रसिकांनी मित्र परिवारासह सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
समूह नृत्ये, सादरीकरण आणि गीत संगीत कार्यक्रमांचे केले आयोजन (fortune) उपक्रमात दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ वाजता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मराठी भाषेची वाटचाल दाखविणारा, श्रवणीय गीतांवरील समुह नृत्ये, सादरीकरण आणि गीत संगीताचा ३९ इये मराठीची नगरी हा सुरेल कार्यक्रम होणार आहे. यामध्ये संत रचनांपासून आजच्या प्रतिभासंपन्न कवीपर्यंत प्रातिनिधिक गीतकारांची निवडक गाणी सादर होणार आहेत. या कार्यक्रमात येथील पदन्यास नृत्यकला अकादमीचा सहभाग आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!