Holiचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि रंगांची उधळण. मात्र रंगांच्या या धुंदीत अनेकदा पक्के रासायनिक रंग त्वचेवर आणि केसांवर घट्ट बसतात आणि ते काढणे अवघड जाते. चुकीच्या पद्धतीने रंग काढण्याचा प्रयत्न केल्यास त्वचेची जळजळ होऊ शकते तसेच केस कोरडे आणि निस्तेज पडू शकतात. त्यामुळे रंग काढताना योग्य पद्धत वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

होळीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सर्वत्र प्री-होळी सेलिब्रेशनचा माहोल पाहायला मिळत आहे. (playing Holi)रंग काढण्याचे उपाय शोधण्यापेक्षा रंग त्वचेवर कमी बसावा याची आधीच काळजी घेणे अधिक फायद्याचे ठरते. होळी खेळायला जाण्यापूर्वी संपूर्ण शरीराला आणि केसांना खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल भरपूर प्रमाणात लावावे. त्यामुळे रंग थेट त्वचेच्या संपर्कात येत नाही आणि नंतर तो सहज निघतो. चेहरा आणि ओठांसाठी पेट्रोलियम जेली लावल्यास त्वचेचे संरक्षण होते.
जर रंग त्वचेवर बसला असेल तर अंघोळीपूर्वी खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा मोहरीच्या तेलाने हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे रंग सैल होऊन निघण्यास मदत होते. (playing Holi)अधिक पक्का रंग लागला असल्यास बेसन, दही, दूध आणि काही थेंब लिंबाचा रस एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट १५ ते २० मिनिटे त्वचेवर ठेवून नंतर हलक्या हाताने चोळून कोमट पाण्याने धुवावी.
लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही रंग काढण्यासाठी उपयोगी ठरते. कोरफड जेल लावल्यास त्वचेची जळजळ कमी होते आणि त्वचा मऊ राहते. मात्र त्वचा संवेदनशील असल्यास लिंबाचा वापर टाळणे योग्य ठरेल.
केसांवरील रंग काढण्यासाठी केस धुण्यापूर्वी कोमट तेलाने मसाज करावा. (playing Holi)त्यानंतर सौम्य किंवा सल्फेट-फ्री शॅम्पूने केस धुवावेत. खूप गरम पाण्याचा वापर टाळावा कारण त्यामुळे त्वचा आणि केस अधिक कोरडे होऊ शकतात. केस धुतल्यानंतर कंडिशनर लावणे आवश्यक आहे, त्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो.
अंघोळीनंतर त्वचेवर चांगले मॉइश्चरायझर किंवा लोशन लावल्यास त्वचा मऊ आणि निरोगी राहते. योग्य काळजी घेतल्यास होळीचा आनंदही घेता येतो आणि त्वचा-केसांची सुरक्षितताही राखता येते.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!