एका महिलेने सर्वात गुटगुटीत बाळाला जन्म दिला आहे.या कुटुंबाला आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना देखील या वजनदार बाळाला पाहुन आश्चर्य वाटले आहे.

सर्वसाधारणपणे मुले जन्माला येतात तेव्हा त्यांचे सरासरी वजन हे तीन किलोच्या आसपास असते. काही मुले ४ वा ४.५ किलोग्रॅम वजनाची असू शकतात. (Woman)परंतू अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक महिलेने एका अशा बाळाला जन्म दिला आहे त्याचे वजन सर्वसाधारण नवजात शिशुच्या वजनाच्या दुप्पट आहे. या बाळाला पाहून त्याचे आई-वडीलच नाही तर डॉक्टर देखील आश्चर्यचकीत झाले. आईने देखील तिच्या सुदृढ बाळाला पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. शॉन ज्युनिअर नावाच्या या विशालकाय बाळाचा जन्म गेल्या ३१ जानेवारी रोजी कायूगा मेडिकल सेंटर येथे झाला. ज्याचे वजन ५.९ किलोग्रॅम ( १३ पाऊंड ) आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार मुलाचे आई-वडील टेरिका आणि शॉन यांनी म्हटले की त्यांना माहिती होते की त्यांचा मुलगा साईजमध्ये थोडा मोठा असेल, परंतू जेव्हा त्यांनी प्रत्यक्षात त्याला पाहिले तर ते हैराण झाले. टेरिका यांनी म्हटले की आम्हाला माहिती होते की तो मोठा असेल. परंतू आम्ही इतका सृदृढ असेल अशी आशा केली नव्हती. जन्मताच हा मुलगा हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेला आतापर्यंतचा सर्वात जास्त वजनाचा मुलगा ठरला आहे.

चार मुलांची आई असलेली टेरिका हिने सांगितले की त्यांचा नवजात मुलगा आतापासूनच तीन ते सहा महिन्यांच्या मुलांचे कपडे आणि डायपर घालत आहे. असे वाटतंय की थेट तीन महिन्याच्या बाळाची आई बनलीय…हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि नर्सेसनी सांगितले की मुलाचा जन्म असामान्य होता. परंतू सर्वकाही ठीक झाले. हॉस्पिटलने नंतर फेसबुक हँडलवर या बाळाचा हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे, ज्यात शॉन ज्युनिअरसोबत एक आणखीन मार्गोट नावाची कन्या दाखविली असून तिचे वजन १.८ किलोग्रॅम होते. आणि तिचाही त्याच दिवशी जन्म झाला होता.

फेसबुक पोस्टमध्ये पुढे लिहिलेय की एका कुटुंबाने शॉन ज्युनिअरचे स्वागत केले आहे.जो रेकॉर्ड बनवणारा १३ पाऊंडचा नवजात शिशु आहे. जो रुग्णालयात जन्माला आलेला आतापर्यंतचा सर्वात मोठे बाळ आहे.(Woman)तर दुसऱ्या कुटुंबाने लहानग्या मार्गोटचे स्वागत केले आहे, जिचे वजन केवल ४ पाऊंड आहे. मार्गोटच्या आईने सांगितले की दोन्ही मुलांना एकसाथ पाहून आपला अनुभव खूपच खास झाला. ही गोष्ट गोड आठवण आहे, सर्वच मुले स्वत: अनोखी आणि खास असतात.

इतिहासातील सर्वात जास्त वजनाचे आणि लांबीचे बाळ हे १९ जानेवारी १८७९ मध्ये अमेरिकेच्या ओहायो राज्यातील सेविले शहरात झाला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मते जन्माच्या वेळी त्या नवजात बाळाचे वजन तब्बल ९.९८ किलोग्रॅम होते, त्याची लांबी जन्मताच २८ इंच ( ७१.१२ सेंटीमीटर ) होती. (Woman)हे बाळ सर्वात जास्त वजनीच नव्हे तर सर्वात जास्त उंचीचे बाळ ठरले. मात्र, आपल्या असाधारण वजनामुळे हे बाळ केवळ दोन तासच जीवंत राहू शकले.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *