मराठी भाषा गौरव दिन राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. राज्यातील विविध शाळांमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. दहिसरच्या विद्यामंदिर शाळेतही असाच एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेत्री ऋतुजा बागवे यांनी उपस्थिती लावली होती.

मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मराठी संस्कृतीचा आणि साहित्याचा अभिमान वाटावा असा हा दिवस… मराठी भाषा फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही तर सर्व सीमा ओलांडून सातासमुद्रापारही गेली आहे. (celebrated)मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे. तसेच मराठी जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. या दिवसाचं औचित्य साधून दहिसरच्या ‘विद्या प्रसारक मंडळा’च्या ‘विद्या मंदिर’ शाळेत शुक्रवारी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विद्यार्थांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी सर्व विभागांचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी सभागृहात उपस्थित होते.

या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.(celebrated) विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी विद्या मंदिर शाळा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते. कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या ‘मराठी राजभाषा दिना’चे औचित्य साधत शब्दशिल्प (खंड तीन) या मराठी हस्तलिखिताचे अनावरण अभिनेत्री बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्या मंदिर इंग्रजी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठी कविता, नाटिका आदी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.

अभिनेत्री ऋतुजा बागवे या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.(celebrated) त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की, पुस्तकांशी मैत्री करा. वाचनाने आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्त्व विकास घडतो. पु. ल. देशपांडे, द .मा. मिरासदार यांच्या पुस्तकाने वाचनाची गोडी निर्माण होते. तसेच नाटक सिनेमा मराठी साहित्य यांचा आस्वाद घ्या. त्याने आयुष्याला दिशा मिळते, याचे उदाहरण आपण स्वतः आहे, असे सांगत विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त केले.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *