देशात सध्या निरनिराळ्या मार्गावर विविध वेगवान ट्रेन चालवल्या जात आहेत. मात्र सर्वात वेगवान ट्रेन म्हणून ना वंदेभारत, ना राजधानी आणि ना शताब्दीचा लौकीक असून सर्वात वेगवान ट्रेन म्हणून या ट्रेनचा उल्लेख केला जात आहे.

भारताच्या सर्वात वेगवान मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा वेग सर्वात जास्त ताशी ३५० किमी असणार आहे.मात्र, तिचे बांधकाम अजूनही सुरु आहे. (Rajdhani) मात्र, सध्याच्या घडील वेगवान ट्रेन म्हटले की वंदेभारत किंवा राजधानी वा शताब्दी एक्सप्रेसचे नाव समोर येते. परंतू खूपच कमी लोकांना माहिती आहे की ऑपरेशनल स्पीडच्या दृष्टीने देशाची सर्वात वेगवान ट्रेन तेजस एक्सप्रेस आहे. भारताची पहिली कॉर्पोरेट शैलीची ट्रेन देखील तेजसच आहे. हिचे संचनल आयआरसीटीसी करत असते.

तेजस एक्सप्रेसची सुरुवात साल २०१९ मध्ये दिल्ली ते लखनऊ मार्गावर झाली होती. त्यानंतर साल २०२० मध्ये अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल मार्गावर दुसरी सेवा सुरु करण्यात आली.प्रवाशांना हवाई प्रवासासारखा आनंद देणारी ही ट्रेन प्रीमियम सेगमेंटमध्ये लोकप्रिय झाली. तांत्रिक रुपाने तेजस एक्सप्रेस २०० किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. (Rajdhani) त्यामुळे भारताच्या पारंपारिक श्रेणीतील ट्रेनमध्ये ही सर्वात जास्त डिझाईन स्पीडची ट्रेन आहे. मात्र,सध्याच्या ट्रॅकची क्षमतेमुळे तेजस १६० किमी प्रति तास वेगाने चालवले जाते, जो वेग वंदेभारत एक्सप्रेसच्या बरोबरीचा आहे.

भारतात अनेक ट्रेनना हायस्पीडसाठी डिझाईन केले आहे. परंतू ट्रॅक आणि सिग्नलिंगच्या मर्यादेमुळे या ट्रेन कमाल डिझाईन वेगावर नियमित रुपाने धावत नाहीत. उदा. वंदेभारत एक्सप्रेसची डिझाईन स्पीड १८० किमी प्रति तास आहे. तर प्रत्यक्षात तिचा परिचालन वेग १६० किमी प्रति तास असतो. दिल्ली ते आगरा धावणारी गतिमान एक्सप्रेस १६० किमी प्रति तास डिझाईन आणि परिचालन दोन्हींचा वेग राखते. राजधानी एक्सप्रेसचे डिझाईन स्पीड १३० ते १४० किमी प्रति तास आहे आणि परिचालन स्पीड सुमारे १३० किमी प्रति तास इतके आहे. तर शताब्दी एक्सप्रेसचा वेग १५० किमी प्रति तास डिझाईन आणि १३० ते १५० किमी प्रति तास परिचालन स्पीड आहे.

तेजस एक्सप्रेसची खासियत केवळ स्पीडच नाही तर यात अनेक प्रीमियम सुविधा देखील आहेत. प्रवाशांना स्वागत पेय, ऑनलाईन भोजन निवड, वर्तमान पत्र, प्रत्येक सिटवर एलईडी स्क्रीनची सोय, वाय-फाय आणि चार्जिंगसारखी सुविधा मिळते. स्वयंचलित दरवाजे, बायो व्हॅक्युम शौचालय आणि नियमित सीसीटीव्हींचा पहारा यास आधुनिक ट्रेनचा दर्जा देतात. ट्रेनला उशीर झाला तर प्रवाशांना रिफंड देणारी ही पहिली ट्रेन आहे. ही प्रथा भारतीय रेल्वेत याच ट्रेनमध्ये आहे.

तेजस एक्सप्रेस ही खाजगी भागीदारीची सफल मॉडेल आहे. साल आर्थिक वर्षे २०२५-२६ च्या तिसऱ्या तिमाहीत या ट्रेनने ५० कोटींचा महसुल जमा केला. दिल्ली – लखनऊ मार्गावर ६९ टक्के प्रवासी भारमान,आणि अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल मार्गावर १०० टक्के भारमान नोंदवला आहे.(Rajdhani) त्यावरुन या ट्रेनची लोकप्रियता समजते. तेजसची लोकप्रियतात पाहाता अन्य शहरात देखील तिची सेवा वाढवण्याचा विचार सुरु आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *