बदलापूर मधील एका नामांकित शाळेच्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. विरोधकांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर सरकारने या प्रकरणी कारवाईचा इशारा दिला आहे.

बुधवारी (25 फेब्रुवारी) बदलापूर मधील एका नामांकित शाळेच्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुरूवारी आरोपी जयेश मुने विरोधात पोस्को आणि अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.(Badlapur) हे प्रकरण सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चर्चेचा विषय बनलं आहे. विरोधकांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर सरकारने या प्रकरणी कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बदलापूर प्रकरणावर आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत आवाज उठवला. सचिन अहिर म्हणाले की, ‘राज्यात विनयभंगाचा प्रकार वाढत चालला आहे. बदलापुरात लहान मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. स्कूल बसचे नियम जपण्याचे वेळोवेळी काम आपण करतो, तरीही एका इको गाडीमध्ये हा भयानक प्रकार घडला आहे. बदलापुरात वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करा. राज्यभरात असे प्रकार घडत आहेत, त्यामुळे सरकारकडून काय उपाययोजना करण्यात येणार आहेत याची माहिती द्या.’ अशी मागणी केली. तसेच अनिल परब यांनी, ‘हा मुद्दा गंभीर आहे, यावर अल्पकालीन चर्चा तरी घ्यावी. प्रत्येक वेळेला हे होत आहे आणि अशा आरोपींना स्वीकृत नगरसेवक केले जाते असा आरोप केला. ‘ यावर सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे.
सचिन अहिर यांच्या मागणीवर बोलताना मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून ने-आण करण्यात येते, त्यासाठी एसओपी तयार करण्यात आली होती. आरटीओला काटेकोरपणे ते नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. बसमध्ये सीसीटीव्ही नसतील तर आजच पुन्हा एकदा सक्त सूचना आरटीओला देण्यात येतील. जे नियम पाळत नाहीत अशा वाहन चालकांवर आणि मालकांवर कठोर कारवाई केली जाईल. (Badlapur) तसेच संस्थाचालकावर देखीलत्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मंत्री देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
बदलापूर विनयभंग प्रकरणातील आरोपी जयेश मुने वर पोस्को आणि अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. (Badlapur) त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला 2 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, बदलापूरमध्ये अवघ्या महिन्याभरात सलग दुसन्यांदा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!