अभिनेत्री(Actress) आणि राज्यसभा खासदार जया बच्चन या त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे केलेल्या गैरवर्तनामुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच, त्यांनी एका व्यक्तीला धक्का मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्यावर टीका केली. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनीही त्यांच्या या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी जया बच्चन यांच्या वर्तनाची निंदा करताना म्हटले की, “आजकाल त्यांचे पत्रकारांसोबतचे वर्तन ‘काय करतोयस तू, कोण आहेस, काय पाहिजे?’ असे असते. हे खूप चुकीचे आहे. तुम्ही त्यांच्यामुळेच आहात आणि हल्ली राज्यसभेत त्या ज्याप्रकारे बोलतात, ते पाहून असे वाटते की एकतर त्या बिघडल्या आहेत किंवा घरातूनच काहीतरी… किंवा मोदींच्या विरोधात बोलण्यासाठीच त्या असे वागतात. त्यांचे युक्तिवाद मला आवडत नाहीत.”

अलीकडेच जया बच्चन(Actress) यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात त्या कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या बाहेर होत्या. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यावर त्या इतक्या संतापल्या की त्यांनी त्या व्यक्तीला धक्का मारला आणि त्याच्यावर ओरडू लागल्या. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली.
कंगना रनौतने देखील आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर जया बच्चन यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांना ‘बिघडलेली आणि विशेषाधिकार असलेली महिला’ म्हटले. तिने लिहिले, “सर्वात बिघडलेली आणि विशेषाधिकार असलेली महिला. लोक त्यांच्या नखऱ्यांवर आणि बकवासावर फक्त यासाठी सहन करतात कारण त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत.
चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनीही जया बच्चन यांच्या वर्तनावर टीका केली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, “हे अत्यंत निंदनीय आहे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले, त्यांच्याबद्दल असा अपमान करणे चुकीचे आहे. एक लोकसेवक २४ तास रागावलेला आणि चिडचिडा राहू शकत नाही. त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकाराकडून नम्रता आणि करुणेची अपेक्षा असते, कारण त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच त्यांना हे स्थान मिळाले आहे.”
हेही वाचा :
दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न
‘हाय अलर्ट’! 160 किमी वेगाने वादळ धडकणार, आजची रात्र ठरेल धोक्याची
1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर होणार नवा नियम लागू