प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या वडिलांचं निधन झालं आहे. एका प्रसिद्ध वृत्त समूहात ते ब्रँड मॅनेजर म्हणून कार्यरत होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्री याच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त समोर येत आहे. पुष्करचे वडील सुधाकर श्रोत्री हे वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व होते. रविवारी 1 मार्च रोजी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते.(Pushkar Shrotri’s) त्यांच्या पश्चात तुषार श्रोत्री, पुष्कर श्रोत्री आणि केतन श्रोत्री हे पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सुधाकर श्रोत्री यांच्या निधनाने साहित्य, सामाजिक आणि वृत्तपत्र वितरण क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. एका नामांकित वृत्त समूहात त्यांनी तब्बल 65 वर्षे वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत मोलाचं योगदान दिलं. त्यासोबतच त्यांना साहित्याची प्रचंड आवड होती. त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत.
सुधाकर श्रोत्री यांनी लिहिलेल्या ‘वडिलोपार्जित’, ‘लेडीत स्पेशन’ आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरवर आधारित ‘खास सचिन’ या कविता संग्रहांचं प्रकाशन झालं आहे. सुधाकर श्रोत्री हे अखेरपर्यंत ‘पार्लेकर कायस्थ’ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते.(Pushkar Shrotri’s) त्यांच्या पार्थिवावर आज (सोमवार, 2 मार्च) सकाळी 8 वाजताच्या सुमारास मुंबईत विलेपार्ले इथल्या पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधाकर यांचा पुत्र आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात सक्रिय आहे. ‘श्शsss घाबरायचं नाही’, ‘लाभले आम्हास भाग्य’, ‘अ पेईंग घोस्ट’ ही त्याची नाटकं सध्या गाजत आहेत. आपल्या जडणघडणीत वडिलांचा मोलाचा वाटा असल्याचं पुष्करने अनेकदा विविध मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरात श्रोत्री कुटुंब वास्तव्यास आहेत. याच ठिकाणी सुधाकर श्रोत्री यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुष्कर हा मराठी आणि हिंदी कलाविश्वात कार्यरत असून तो निर्माता आणि दिग्दर्शकसुद्धा आहे. (Pushkar Shrotri’s) त्याने मराठी आणि हिंदी भाषांमधील 25 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2014 मध्ये त्याने ‘रेगे’ या चित्रपटात पोलीस अधिकारी सचिन वाझेंची भूमिका साकारली होती. हसवा फसवी, सूर्याची पिल्ले, एक परिपूर्ण हत्या, आजीबाई जोरात ही त्याची नाटकंसुद्धा विशेष गाजली आहेत. पुष्करने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही काम केलंय.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!