कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

अपेक्षेप्रमाणे शनिवारी इजरायल (breaks)आणि अमेरिका या दोन राष्ट्रांनी संयुक्तपणे इराणवर भीषण हल्ला केला. तेहरानवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खोमेनीयांच्यासह त्यांचे कुटुंबीय व इतरांचा मृत्यू झाल्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती अतिशय गंभीर वळणावर पोहोचली आहे. रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांनी या हल्ल्याच्या संदर्भात इजरायल व अमेरिकेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

हे तिन्ही देश मध्य पूर्वेतील युद्धात (breaks)सहभागी झाले तर तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडणार आहे. इजराइल आणि अमेरिका यांनी इराणवर हल्ला करताना काही इस्लामिक देशांचे हवाई तळ वापरल्यामुळे संतापलेल्या इराणने त्यांच्यावरही हल्ले चढवले आहेत. याचा अर्थ इराणला एकाच वेळी अनेक देशांशी सामना करावा लागतो आहे. इजराइल ला स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इराणचे अस्तित्व धोक्याचे वाटते आहे तर इरांणकडून सुरू असलेला आण्विक कार्यक्रम हा भविष्यात धोकादायक ठरू शकतो असे अमेरिकेला वाटते आणि म्हणूनच या दोघांनी एकत्र येऊन इराणवर हल्ला चढवताना तेथील अनेक मोठ्या शहरांना लक्ष्य केले आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी ,(breaks) संरक्षण मंत्री, तसेच चीफ ऑफ आर्मी हे मृत्युमुखी पडल्यानंतर संपूर्ण इराणवर शोक कळा पसरली आहे. तथापि गेल्याच महिन्यात तेथील जन आंदोलन मोडून काढण्यात आल्यामुळे, संबंधितांच्याकडून अली खोमेनी यांच्या मृत्यूचे स्वागत केले गेले आहे. पण ही मंडळी संख्येने कमी आहेत. आणि खोमेनी यांच्या मृत्यूमुळे शोक सागरात बुडालेले संख्येने प्रचंड आहेत. विशेषतः खोमेनी यांच्या मृत्यूनंतर इराणी जनतेने त्यांच्या हितासाठी इराणमधील विद्यमान सत्ता उलथवून टाकावी, अशी संधी पुन्हा प्राप्त होणार नाही असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेत्यानाहू यांनी केले आहे.

तथापि आम्ही अमेरिकेला धडा शिकवू असा इशारा इराण कडून देण्यात आला आहे याचा अर्थ मध्यपूर्वेतील हा युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. इराणच्या अखत्यारीत येत असलेल्या 33 किलोमीटर लांबीच्या हार्मोझ सागरी हद्दीतून मालवाहतुकीस प्रतिबंध घातला गेला आहे आणि रविवारी स्कायलाईट नावाचे तेल वाहू जहाज इराणने हल्ला करून पेटवून दिले. या हद्दीतून दररोज एकूण इंधनपुरवठ्यापैकी 20% इंधनपुरवठा केला जात असतो. आता हा मार्गच बंद केल्यामुळे अनेक देशांना इंधन टंचाईला सामोरे जावे लागेल अशी लक्षणे दिसू लागली आहेत.

इस्रायल आणि अमेरिका यांनी (breaks)संयुक्तपणे इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर लेबनॉन, जॉर्डन, ओमान, बहरीन, शारजाह, कतार, कुवेत, इराक आणि दुबई हे देश सुद्धा युद्धसदृश्य परिस्थितीला सामोरे जात आहेत. कारण याच राष्ट्रांचे हवाई तळ इराणवर हल्ला करण्यासाठी वापरले जाऊ लागले आहेत. त्यामुळे इराणने या देशांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू केले आहेत. दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीच्या जवळपास इराणने क्षेपणास्त्रे डागली आहेत.

तसेच अन्य देशातील काही पंचतारांकित हॉटेल्सहीक्षेपणास्त्रांच्या माऱ्यात आलेली आहेत. अली खोमेनी यांच्या मृत्यूनंतर इराण मध्ये 40 दिवसांचा दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. (breaks)तर त्यांचे वारसदार म्हणून मोजताब खोमेनी यांची नियुक्ती केली गेली आहे. इराणच्या सुप्रीम लीडरचा क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराण हा सरेंडर होईल किंवा युद्ध बंदीची एकतर्फी घोषणा करेल हा डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन यांचा अंदाज फोल ठरला आहे. हे युद्ध किमान एक महिना चालेल असा इशारा इजराइल व अमेरिकेने दिलेला आहे आणि इराणने युद्ध आम्हीच संपवू असे प्रत्युत्तर दिल्यामुळे मध्यपूर्वेतील भडका थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. उलट ते आणखी तीव्र होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. ‌

सध्या रमजानचे रोजे चालू आहेत. हा महिना मुस्लिमांसाठी अतिशय पवित्र असतो. आणि याच धार्मिक सणाच्या काळात इजरायल आणि अमेरिकेने हल्ले सुरू केल्यामुळे मुस्लिम जगत बिथरलेले आहे. अली खोमेनी त्यांच्या मृत्यूनंतर जनमत आणखी खवळले आहे. पाकिस्तानच्या कराची मधील तसेच लाहोर मधील अमेरिकेच्या दुतावासांवर संतप्त मुस्लिमांनी हल्ले चढवले आहेत. कराची मध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. इराक मध्ये ही तशीच परिस्थिती आहे. भारतातील लखनऊमध्ये तसेच जम्मू कश्मीरमध्ये इराण वरील हल्ल्याचा निषेधकेला जातो आहे. तिथे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

ज्या मुस्लिम देशांचे हवाई तळ या युद्धासाठी अमेरिकेने वापरले आहेत तेथील जनतेलाही या युद्धाच्या झळा बसू लागल्या आहेत. इराण मध्ये तसेच कतार, दुबई वगैरे देशांमध्ये भारतीय लोक अडकून पडले आहेत. त्यांचे एयरलिफ्टिंग कसे करायचे यावर सध्या चर्चा सुरू आहे. मध्यपूर्वक सुरू असलेल्या युद्धाबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे आणि संबंधित देशांनी वाटाघाटीच्या टेबलावर प्रश्न सोडवावेत असे आवाहन केले आहे तर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद केलेला आहे. सध्या तरी भारताने तटस्थ भूमिका घेतलेली आहे आणि ती योग्य आहे. युद्ध भडकलेले असताना मुंबईत बसून प्रत्येक जागतिक आणि अंतर्गत घडामोडीवर बोलायलाच पाहिजे अशी भूमिका घेणाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांनी हे युद्ध थांबवावे असे केलेले आवाहन हास्यास्पद म्हणावे लागेल.आपण काय बोलत आहोत याचे तरी किमान संबंधितांनी भान ठेवणे आवश्यक आहे. इजरायल आणि अमेरिका या दोन देशांनी इराणवर शनिवारी हल्ला करण्यापूर्वी त्याचे नियोजन जानेवारी महिन्यात केलेले होते असे म्हणावे लागेल. कारण या दोन्ही राष्ट्रांनी एकत्र येऊन इराणवर केलेला हा हल्ला अतिशय सुसूत्र आणि नियोजित आहे. हल्ले कुठे करायचे कसे करायचे आणि केव्हा करायचे याचे नियोजन करताना इराणचे सुप्रीम लीडर खोमेनी यांचे राजधानी तेहरांनच्या मध्यवर्ती भागात असलेले निवासस्थान अचूकपणे उडवण्याचे नियोजन केले होते. शनिवारीच त्यांच्या निवासस्थानावर हल्ला केलेला होता आणि रविवारी या हल्ल्याचे दृश्य परिणाम पुढे आले. अली खोमेनी, त्यांची कन्या, जावई, नात व इतर 40 व्यक्ती मृत्युमुखी पडल्याचे रविवारी अधिकृतपणे जगाला समजले. त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाने आता वेगळे वळण घेतले आहे असे म्हणता येईल.अपेक्षेप्रमाणे शनिवारी इजरायल आणि अमेरिका या दोन राष्ट्रांनी संयुक्तपणे इराणवर भीषण हल्ला केला. तेहरानवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खोमेनीयांच्यासह त्यांचे कुटुंबीय व इतरांचा मृत्यू झाल्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती अतिशय गंभीर वळणावर पोहोचली आहे.

रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांनी या हल्ल्याच्या संदर्भात इजरायल व अमेरिकेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. हे तिन्ही देश मध्य पूर्वेतील युद्धात सहभागी झाले तर तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडणार आहे. इजराइल आणि अमेरिका यांनी इराणवर हल्ला करताना काही इस्लामिक देशांचे हवाई तळ वापरल्यामुळे संतापलेल्या इराणने त्यांच्यावरही हल्ले चढवले आहेत. याचा अर्थ इराणला एकाच वेळी अनेक देशांशी सामना करावा लागतो आहे. इजराइल ला स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इराणचे अस्तित्व धोक्याचे वाटते आहे तर इरांणकडून सुरू असलेला आण्विक कार्यक्रम हा भविष्यात धोकादायक ठरू शकतो असे अमेरिकेला वाटते आणि म्हणूनच या दोघांनी एकत्र येऊन इराणवर हल्ला चढवताना तेथील अनेक मोठ्या शहरांना लक्ष्य केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी , संरक्षण मंत्री, तसेच चीफ ऑफ आर्मी हे मृत्युमुखी पडल्यानंतर संपूर्ण इराणवर शोक कळा पसरली आहे.

तथापि गेल्याच महिन्यात तेथील जन आंदोलन मोडून काढण्यात आल्यामुळे, संबंधितांच्याकडून अली खोमेनी यांच्या मृत्यूचे स्वागत केले गेले आहे. पण ही मंडळी संख्येने कमी आहेत. आणि खोमेनी यांच्या मृत्यूमुळे शोक सागरात बुडालेले संख्येने प्रचंड आहेत. विशेषतः खोमेनी यांच्या मृत्यूनंतर इराणी जनतेने त्यांच्या हितासाठी इराणमधील विद्यमान सत्ता उलथवून टाकावी, अशी संधी पुन्हा प्राप्त होणार नाही असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेत्यानाहू यांनी केले आहे. तथापि आम्ही अमेरिकेला धडा शिकवू असा इशारा इराण कडून देण्यात आला आहे याचा अर्थ मध्यपूर्वेतील हा युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. इराणच्या अखत्यारीत येत असलेल्या 33 किलोमीटर लांबीच्या हार्मोझ सागरी हद्दीतून मालवाहतुकीस प्रतिबंध घातला गेला आहे आणि रविवारी स्कायलाईट नावाचे तेल वाहू जहाज इराणने हल्ला करून पेटवून दिले. या हद्दीतून दररोज एकूण इंधनपुरवठ्यापैकी 20% इंधनपुरवठा केला जात असतो. आता हा मार्गच बंद केल्यामुळे अनेक देशांना इंधन टंचाईला सामोरे जावे लागेल अशी लक्षणे दिसू लागली आहेत. इस्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर लेबनॉन, जॉर्डन, ओमान, बहरीन, शारजाह, कतार, कुवेत, इराक आणि दुबई हे देश सुद्धा युद्धसदृश्य परिस्थितीला सामोरे जात आहेत.

कारण याच राष्ट्रांचे हवाई तळ इराणवर हल्ला करण्यासाठी वापरले जाऊ लागले आहेत. त्यामुळे इराणने या देशांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू केले आहेत. दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीच्या जवळपास इराणने क्षेपणास्त्रे डागली आहेत. तसेच अन्य देशातील काही पंचतारांकित हॉटेल्सहीक्षेपणास्त्रांच्या माऱ्यात आलेली आहेत. अली खोमेनी यांच्या मृत्यूनंतर इराण मध्ये 40 दिवसांचा दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर त्यांचे वारसदार म्हणून मोजताब खोमेनी यांची नियुक्ती केली गेली आहे. इराणच्या सुप्रीम लीडरचा क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराण हा सरेंडर होईल किंवा युद्ध बंदीची एकतर्फी घोषणा करेल हा डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन यांचा अंदाज फोल ठरला आहे. हे युद्ध किमान एक महिना चालेल असा इशारा इजराइल व अमेरिकेने दिलेला आहे आणि इराणने युद्ध आम्हीच संपवू असे प्रत्युत्तर दिल्यामुळे मध्यपूर्वेतील भडका थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. उलट ते आणखी तीव्र होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. ‌ सध्या रमजानचे रोजे चालू आहेत. हा महिना मुस्लिमांसाठी अतिशय पवित्र असतो. आणि याच धार्मिक सणाच्या काळात इजरायल आणि अमेरिकेने हल्ले सुरू केल्यामुळे मुस्लिम जगत बिथरलेले आहे. अली खोमेनी त्यांच्या मृत्यूनंतर जनमत आणखी खवळले आहे. पाकिस्तानच्या कराची मधील तसेच लाहोर मधील अमेरिकेच्या दुतावासांवर संतप्त मुस्लिमांनी हल्ले चढवले आहेत. कराची मध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

इराक मध्ये ही तशीच परिस्थिती आहे. भारतातील लखनऊमध्ये तसेच जम्मू कश्मीरमध्ये इराण वरील हल्ल्याचा निषेधकेला जातो आहे. तिथे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ज्या मुस्लिम देशांचे हवाई तळ या युद्धासाठी अमेरिकेने वापरले आहेत तेथील जनतेलाही या युद्धाच्या झळा बसू लागल्या आहेत. इराण मध्ये तसेच कतार, दुबई वगैरे देशांमध्ये भारतीय लोक अडकून पडले आहेत. त्यांचे एयरलिफ्टिंग कसे करायचे यावर सध्या चर्चा सुरू आहे. मध्यपूर्वक सुरू असलेल्या युद्धाबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे आणि संबंधित देशांनी वाटाघाटीच्या टेबलावर प्रश्न सोडवावेत असे आवाहन केले आहे तर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद केलेला आहे. सध्या तरी भारताने तटस्थ भूमिका घेतलेली आहे आणि ती योग्य आहे. युद्ध भडकलेले असताना मुंबईत बसून प्रत्येक जागतिक आणि अंतर्गत घडामोडीवर बोलायलाच पाहिजे अशी भूमिका घेणाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांनी हे युद्ध थांबवावे असे केलेले आवाहन हास्यास्पद म्हणावे लागेल.आपण काय बोलत आहोत याचे तरी किमान संबंधितांनी भान ठेवणे आवश्यक आहे.इजरायल आणि अमेरिका या दोन देशांनी इराणवर शनिवारी हल्ला करण्यापूर्वी त्याचे नियोजन जानेवारी महिन्यात केलेले होते असे म्हणावे लागेल.

कारण या दोन्ही राष्ट्रांनी एकत्र येऊन इराणवर केलेला हा हल्ला अतिशय सुसूत्र आणि नियोजित आहे. हल्ले कुठे करायचे कसे करायचे आणि केव्हा करायचे याचे नियोजन करताना इराणचे सुप्रीम लीडर खोमेनी यांचे राजधानी तेहरांनच्या मध्यवर्ती भागात असलेले निवासस्थान अचूकपणे उडवण्याचे नियोजन केले होते. शनिवारीच त्यांच्या निवासस्थानावर हल्ला केलेला होता आणि रविवारी या हल्ल्याचे दृश्य परिणाम पुढे आले. अली खोमेनी, त्यांची कन्या, जावई, नात व इतर 40 व्यक्ती मृत्युमुखी पडल्याचे रविवारी अधिकृतपणे जगाला समजले. त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाने आता वेगळे वळण घेतले आहे असे म्हणता येईल.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *