उन्हाळ्याच्या दिवसांत कडक ऊन आणि वाढलेली उष्णता यामुळे थंड पदार्थांची मागणी झपाट्याने वाढते. अशा वेळी आईस्क्रीम किंवा कुल्फी खाणे हा अनेकांचा आवडता पर्याय असतो. थंडगार आईस्क्रीममुळे काही क्षणांतच ताजेतवाने वाटते. मात्र अनेक जण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात आणि याच सवयीबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे.

डॉक्टरांच्या मते, अतिशय थंड आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास घशावर अचानक तापमान बदलाचा परिणाम होतो. आईस्क्रीममुळे आधीच घशातील स्नायू आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. (summer) त्यानंतर लगेच पाणी गेल्यास हा बदल अधिक तीव्र होऊ शकतो. परिणामी घसा खवखवणे, घसा बसणे किंवा सूज येणे यासारखे त्रास जाणवू शकतात. विशेषतः ज्यांना वारंवार सर्दी किंवा टॉन्सिलचा त्रास होतो, त्यांनी अधिक काळजी घ्यावी.
पचनसंस्थेवरही याचा परिणाम होऊ शकतो. आईस्क्रीममध्ये फॅट आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. थंड पदार्थांमुळे पचनक्रिया काही काळ मंदावते. अशा वेळी लगेच पाणी प्यायल्यास पोटात जडपणा, गॅस किंवा अस्वस्थता जाणवू शकते. काही तज्ज्ञांच्या मते, थंड आणि गोड पदार्थ एकत्रितपणे घेतल्यास आतड्यांच्या हालचालींवरही तात्पुरता परिणाम होऊ शकतो.
दातांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ही सवय घातक ठरू शकते. अतिथंड आईस्क्रीममुळे दातांच्या इनॅमलवर ताण येतो. त्यानंतर लगेच पाणी घेतल्यास तापमानातील बदलामुळे दात अधिक संवेदनशील होऊ शकतात. (summer) त्यामुळे दात दुखणे किंवा झिणझिण्या येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
तहान लागण्यामागे शरीरातील हार्मोनल प्रक्रिया कारणीभूत असते. गोड पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरात नावाचा हार्मोन स्रवतो. हा हार्मोन मेंदूतील हायपोथॅलेमसला पाण्याची गरज असल्याचा संदेश देतो. त्यामुळे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तहान लागणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र तहान लागली म्हणून लगेचच थंड पाणी पिणे योग्य नाही.
तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे थांबावे. शरीर आणि घशाला सामान्य तापमानाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यानंतर साधे, खोलीच्या तापमानाचे पाणी प्यावे. (summer) फ्रीजमधील अतिथंड पाणी टाळणे अधिक सुरक्षित ठरते. योग्य वेळ आणि पद्धतीने पाणी घेतल्यास उन्हाळ्यात थंड पदार्थांचा आनंद घेतानाही आरोग्याची काळजी घेता येऊ शकते.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!