1989 साली प्रदर्शित झालेला चांदनी हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरला. त्या काळात अॅक्शन आणि मसाला चित्रपटांचा बोलबाला असताना शुद्ध प्रेमकथेवर आधारित आणि संगीतप्रधान असा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक वेगळीच पर्वणी ठरला. चित्रपटात श्रीदेवी, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांसारखे दिग्गज कलाकार असूनही चर्चेचा केंद्रबिंदू ठरल्या त्या श्रीदेवीच.

या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्गज दिग्दर्शक यश चोपड़ा यांनी केले होते. (The film Chandni) त्यांच्या खास रोमँटिक शैलीत साकारलेली ही प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य लोकेशन्सवर चित्रित करण्यात आलेली गाणी, आकर्षक वेशभूषा आणि भावनिक कथानक यामुळे चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळाली.
चित्रपटातील गाण्यांनी तर लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले. ‘मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियां’ आणि ‘मैं ससुराल नहीं जाऊंगी’ यांसारखी गाणी आजही लग्नसमारंभांमध्ये आणि विशेष कार्यक्रमांमध्ये ऐकू येतात. संगीतकारांनी दिलेल्या सुरेल धुनांना श्रीदेवींच्या मोहक अदांनी चार चाँद लावले.(The film Chandni) सुमारे 8 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 27 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज यश मिळवले. त्या काळात ही कमाई प्रचंड मानली जात होती. यशस्वी कमाईसोबतच या चित्रपटाला 37व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट’ हा सन्मानही मिळाला.
विशेष म्हणजे, दोन मोठे पुरुष कलाकार असतानाही चित्रपटाचे सर्वाधिक श्रेय श्रीदेवींनाच मिळाले. त्यांच्या अभिनयाने, भावनांच्या अभिव्यक्तीने आणि फॅशन सेन्सने त्या काळातील तरुणींमध्ये नवा ट्रेंड निर्माण केला. पांढऱ्या रंगाच्या साड्या, लांब केसांची स्टाईल आणि साधेपणातला ग्लॅमर यामुळे त्या ‘इंडस्ट्रीची चांदनी’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.(The film Chandni) आजही ‘चांदनी’ म्हटले की सर्वप्रथम आठवते ती श्रीदेवींचीच मोहक प्रतिमा. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर यश मिळवले नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक संगीतपटांचा एक नवा अध्याय लिहिला.
हेही वाचा :
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!
बागेतलं हे फुल घेतं माणसांचा जीव, कधीच लावू नका हात; अन्यथा होतो अनर्थ!
दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण