100 मुलांचा सांभाळ करु शकते नवरा आणि एका मुलात का अडकू? लग्नाबद्दल प्राजक्ता माळी स्पष्टच बोलली, ‘मला असं आयुष्य जगायचंच नाही. मी मान्य केलंय की सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा


झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकताच अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी उदयपूर याठिकाणी मोठ्या शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.(Prajakta Mali) पण आता मराठमोठी अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी लग्न करणार याबद्दल कायम चर्चा रंगत असते आता खुद्द अभिनेत्रीने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं नवरा, एक मुलहा असा इतक्या छोट्या जगात मला माझं आयुष्य काढायचं नाही. असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्राजक्ता हिने लग्नाबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता हिला लग्नाबद्दल विचारण्यात आलं. यावर प्राजक्ता म्हणाली, ‘माझं लग्न तर होणार नाहीये कारण युनिव्हर्सला माहितीये मी सिंगल राहावं. मी सध्या तरी लग्न करण्याच्या झोनमध्ये नाही माझ्या आईला माझ्या लग्नाबद्दल फार काही वाटत असतं इंडस्ट्रीमध्ये ते अवघड आहे आणि मला स्वतःला लग्न करायला हवं असं वाटत नाही.’

‘आणखी एक गोष्ट, जगात सर्वांना सर्वकाही मिळत नाही तुम्हाला प्रसिद्धी, पैसा मिळाला आहे, तर (Prajakta Mali) आता प्रेम मिळणार नाही देवं सगळं कसं काय देईलप्रेक एक प्रकारचा त्याग आहे आणि ते मी आता स्वीकारलं आहे लग्न झालं किंवा नाही झालं तरी मला काहीही फरक पडत नाही मला माहितीय, माझा प्रायोरिटी माझं कुटुंब कधीच नसेल माझी सोशल लाईफ, माझं करियर माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे

पुढे प्राजक्ता म्हणाली, ‘मी, माझा नवरा, माझा मुलगा इतकं छोटं आयुष्य मला नकोय… एकच मूल का? जर मी 100 मुलांचा सांभाळ करु शकते मी 100 मुलांना दत्तक घेऊ शकते मी त्यांचा सांभाळ करु शकते. (Prajakta Mali) जर मी संपूर्ण शहराला इन्फ्लुएन्स करू शकते, तर मी एका कुटुंबाला का इन्फ्लुएन्स करू? अशात कोणी समदार भेटला तर ठिक आता लग्नाचा निर्णय मी देवाकडे आहे. मी त्यासाठी प्रयत्न करत नाही माझी आई प्रयत्न करत आहे.’ असं देखील प्राजक्त माळी म्हणाली.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *