दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि (Vijay Deverakonda) अभिनेत्री हे सध्या केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच नव्हे तर सामाजिक बांधिलकीमुळेही चर्चेत आले आहेत. उदयपूर येथे पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्यानंतर या लोकप्रिय जोडीने थेट विजयच्या मूळ गावी जाऊन एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे सर्वत्र त्यांच्या उदार मनाचे कौतुक होत आहे

लग्नानंतर काही दिवसांतच ही जोडी तेलंगणातील नगरकुरनूल जिल्ह्यातील अंचमपेट गावात पोहोचली.(Vijay Deverakonda) गावकऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी विजयने स्थानिक नागरिकांशी संवाद साधत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या मातीप्रती असलेली नाळ जपण्याची भावना व्यक्त केली.
याच वेळी त्याने आपल्या ‘देवरकोंडा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून मोठी घोषणा केली. परिसरातील तब्बल ४४ सरकारी शाळांमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांच्या तयारीत कोणतीही अडचण येऊ नये, त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाता यावे आणि शिक्षणात सातत्य राहावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्याने स्पष्ट केले.
सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. विजय आपल्या मातृभाषेत गावकऱ्यांना संबोधित करताना दिसतो. (Vijay Deverakonda) त्याच्या शब्दांत आपल्या गावी काहीतरी परत देण्याची प्रामाणिक इच्छा स्पष्ट जाणवत होती. त्याची ही घोषणा ऐकताच उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. हा क्षण विजयच्या कुटुंबासाठीही अत्यंत भावूक ठरला. आई माधवी यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू दाटले होते. रश्मिका मंदानानेही या उपक्रमाचे कौतुक करत विजयच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. भाऊ आनंद देवरकोंडानेही भावाच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले.
लग्नानंतर लगेचच असा समाजोपयोगी निर्णय घेतल्यामुळे विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात सुपरस्टार ठरला आहे. केवळ पडद्यावर नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातही हिरो कसा असावा, याचे उदाहरण त्याने घालून दिले आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!
बागेतलं हे फुल घेतं माणसांचा जीव, कधीच लावू नका हात; अन्यथा होतो अनर्थ!
दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण