सूर्यग्रहणाचा दिवस ज्योतिषशास्त्रात अत्यंत संवेदनशील आणि ऊर्जायुक्त मानला जातो. या दिवशी केलेली साधना, जप-तप आणि दानधर्म विशेष फलदायी ठरतो अशी श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मान-सन्मान, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, करिअर आणि पितृकारक ग्रह मानला जातो.(solar eclipse) त्यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट ठेवण्यासाठी सूर्यग्रहणाच्या काळात काही विशिष्ट वस्तूंचे दान करण्याची परंपरा आहे.

ज्योतिष मतानुसार सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनातील अडथळे कमी होतात असे मानले जाते. सूर्यग्रहणाच्या दिवशी गुळाचे दान करणे विशेष शुभ समजले जाते. (solar eclipse) गुळ हा गोडवा आणि स्थैर्याचे प्रतीक मानला जातो. तो दान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतात अशी श्रद्धा आहे. नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता हवी असल्यास गुळाचे दान लाभदायी मानले जाते.
तांबे हा धातू सूर्याशी जोडला जातो. तांब्याच्या भांड्यांचे दान केल्यास कुंडलीतील सूर्य मजबूत होतो आणि समाजात मान-सन्मान वाढतो असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. तसेच गहू हा धान्यप्रकार सूर्याशी संबंधित मानला जातो. सूर्यग्रहणाच्या दिवशी गरजूंना गव्हाचे दान केल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते अशी समजूत आहे.
याचबरोबर नारळ आणि काळे तीळ यांचे दानही या दिवशी विशेष फलदायी मानले जाते. या वस्तूंचे दान केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते आणि मानसिक शांतता लाभते असे अनेकांचे मत आहे. ग्रहणकाळात दान करताना स्वच्छता, श्रद्धा आणि निस्वार्थ भाव महत्त्वाचा मानला जातो. (solar eclipse) वाचकहो, वरील माहिती ही केवळ पारंपरिक श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यातील दाव्यांना शास्त्रीय आधार नाही. कोणताही धार्मिक किंवा वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!
बागेतलं हे फुल घेतं माणसांचा जीव, कधीच लावू नका हात; अन्यथा होतो अनर्थ!
दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण