रेल्वे स्टेशन आणि ट्रेनच्या डब्यातील महिलांचे वाद काही नवीन गोष्ट नाही. (local) असाच एक वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांच्या डब्यात एका तरुणीला मारहाण करून तिचे केस ओढत जबरदस्तीने लोकलमधून खाली उतरवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. हा प्रकार कल्याणहून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलमध्ये घडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, स्थानकावरून लोकल सुटत असताना ही तरुणी गाडीत चढण्याच्या प्रयत्नात होती.

यावेळी गर्दीमुळे तोल जाऊन ती पडली. त्यानंतर डब्यातील काही (local)महिला प्रवाशांनी तिच्यावर संताप व्यक्त करत मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. इतकेच नव्हे तर तिचे केस ओढत तिला जबरदस्तीने खाली उतरवण्यात आल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय.या घटनेमुळे स्टेशन परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय. महिलांच्या डब्यातच अशी मारहाण झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या प्रकाराचा निषेध केला. ‘गर्दी असली तरी मारहाण योग्य नाही’, अशी प्रतिक्रिया काही युजर्सने दिलीये.

तर काहींनी रेल्वे प्रशासनाने सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली.(local)घटनेबाबत रेल्वे पोलीस यांच्याकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हिडिओच्या आधारे संबंधित महिलांची ओळख पटवून कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होतेय.दरम्यान, मुंबई उपनगरी रेल्वेतील वाढती गर्दी आणि त्यातून उद्भवणारे वाद याबाबत प्रवासी संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, गर्दीच्या वेळेत प्रवाशांमध्ये धक्काबुक्की आणि वादाच्या घटना वाढत असून त्यासाठी अधिक सुरक्षा कर्मचारी आणि जनजागृतीची गरज आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *