कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

‌ इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते (situation)आयातुल्ला अली खामेनी यांना शनिवारी सकाळीच बॉम्ब वर्षाव करून ठार मारल्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती भयंकर बिघडली आहे. युद्धाचा विस्तार झाला आहे.

त्याचे पश्चिम आशियाई देशांवर प्रतिकूल(situation) परिणाम होत आहेत आणि युद्ध थांबले नाही तर या देशांमध्ये महागाईचा भडका उडण्याची शक्यता दाट आहे. इजरायल आणि अमेरिकेच्या मदतीला आता नाटो राष्ट्रेही येण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्ध इतर देशांमध्येही पसरण्याची भीती आहे. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयात अली खामेनी हे सिया पंथीय होते आणि त्यामुळे जगभरातील शियापंथीय मुस्लिमामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे आणि त्याला भारतही (situation)अपवाद नाही.

काश्मीर आणि उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये मुस्लिमांनी शोक आंदोलन सुरू केले आहे. काश्मीर मधील या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. इजराइल आणि अमेरिकेच्या विरोधात निषेधाचे मोर्चे काढले जाऊ लागले आहेत. वास्तविक अमेरिका ‌आणि इजराइलला मध्यपूर्वेतील राजेशाही असलेल्या अनेक इस्लामिक देशांचा सक्रिय पाठिंबा आहे.
या इस्लामिक देशांनी आपले हवाई तळ अमेरिकेला वापरण्यास दिलेले आहेत.

जॉर्डन, येमेन, ओमान, बहारीन, (situation)कतार, कुवेत, इराक, अरब अमिरात, लेबनॉन, या इस्लामिक देशांनी त्यांचे हवाई तळ अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. खामेनी यांचा बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर, शिया मुस्लिमांनी, या देशांचाही निषेध करणे आवश्यक होते आणि आहे. पण त्यांनी फक्त इजराइल आणि अमेरिकेचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करणे अशी सोयीची भूमिका घेतलेली आहे.

भारतामध्ये शिया आणि सुन्नी असे दोन्हीही मुस्लिम संप्रदाय आहेत. या मंडळींनी काश्मीर खोऱ्यात आणि उत्तर प्रदेश मध्ये‌ खामेनी यांच्या मृत्यूबद्दल मातम सुरू केला आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून इजराइल आणि अमेरिकेचा निषेध नोंदवणे यात काही गैर आहे असे नाही मात्र याच मंडळींनी पहलगाम येथे 26 पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून ठार मारले तेव्हा या मंडळींनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा निषेध केला नाही. (situation)दुसऱ्या देशातील सर्वोच्च धर्मगुरूंचा मृत्यू झाल्यानंतर इथे निषेध करणे, नरेंद्र मोदी यांच्याकडून इजराइल आणि अमेरिकेचा निषेध झाला पाहिजे अशी अपेक्षा धरणे गैर वाजवी आहे.

सध्या प्रसार माध्यमावर त्याचीच चर्चा जोरदार सुरू आहे. युद्धाला तोंड फोडण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनला त्यांचे हवाई तळ वापरण्यासाठी मागितले होते. पण त्यांनी त्यास नकार दिला. पण आता ब्रिटनने आपले हवाई तळ इराणविरोधी हल्ला करण्यासाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या युद्धात ब्रिटन नाही भागीदार झाला आहे. (situation)पाठोपाठ फ्रान्स आणि जर्मनी हे दोन देश आहे अमेरिकेच्या समर्थनात उतरले आहेत. याचा अर्थ नाटो संघटनेतील देश इजराइल अमेरिकेच्या बाजूने इराणविरोधी युद्धात उतरतील असे वाटते. तसे झाले तर तिसरे महायुद्ध सुरू झाले असे म्हणता येईल. एकूणच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन थांबलेले आहे.

मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडाल्यानंतर, इराणने हार्मुझ समुद्र वाहतुकीसाठी बंद केला आहे. या मार्गाने इंधनाच्या एकूण वाहतुकीपैकी 20% वाहतूक
रोज केली जाते. भारत आखाती देशांकडून जवळपास 65 टक्के इंधन विकत घेते . त्याची ‌वाहतूक याच समुद्री मार्गे होते. आणखी 20 टक्के इंधन इतर देशातून भारत खरेदी करतो. इराणने इंधन वाहतुकीला प्रतिबंध केल्यानंतर भारतामध्ये नजीकच्या काही दिवसात इंधन टंचाई होऊ शकते किंवा अन्य पर्यायी देशाकडून
वाढीव दराने इंधन खरेदी करावे लागेल. इंधनाचे दर वाढल्यानंतर सर्व प्रकारच्या महागाईत वाढ होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे युद्ध थांबवण्यात यावे. वाटाघाटीतून मार्ग निघतो. असे आवाहन केले असले तरी सद्यस्थितीत या आवाहनाला प्रतिसाद मिळण्याची शक्यता जवळपास नाही.

रशिया आणि चीनने इजराइल अमेरिकेचा निषेध केला आहे मात्र जगातील अन्य देशांनी तटस्थ भूमिका घेतलेली दिसते. भारताने अशीच अलिप्त भूमिका घेतलेली आहे. अलि खामेनी त्यांच्या निधनानंतर आयातुला अराफी यांना हंगामी सर्वोच्च नेते म्हणून निवडले गेले आहे तथापि सोमवारी दिवसभर त्यांनाही ठार मारल्याची बातमी सोशल मीडियावर तसेच दूरदर्शनवर फिरत होती. मात्र दुसरा मिळाला नव्हता. इराणने सुद्धा इजरायलच्या बेंजामिन नेत्यानाहू यांच्या बंकरवर हल्ला केल्याचा गावा केला होता. एकूणच हे युद्ध लांबणार आहे आणि त्याच्या झळा जगातील सर्व सामान्य जनतेला बसणार आहेत एवढे मात्र खरे.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *