गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता महाराष्ट्रातील पारंपरिक पैठणी साड्यांवरही दिसू लागला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या वाढीचा थेट परिणाम पैठणी साड्यांच्या किमतीवर होत असून येवल्यातील कारागीर आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला हे शहर पैठणी साड्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक मानली जाणारी येवल्याची पैठणी देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. पारंपरिक डिझाइन, रंगसंगती आणि अस्सल जरीमुळे या साड्यांना मोठी मागणी असते. साधारण पाच हजार रुपयांपासून सुरू होणाऱ्या या साड्यांची किंमत काही वेळा लाखो रुपयांपर्यंतही पोहोचते.
पैठणी साड्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील अस्सल जरी. ही जरी तयार करण्यासाठी चांदीच्या बारीक तारांचा वापर केला जातो आणि त्यावर सोन्याचा मुलामा चढवला जातो. (sarees) त्यामुळे साडीला विशेष राजेशाही चमक प्राप्त होते. मात्र, सध्या सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठल्याने जरी तयार करण्याचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी पैठणी साड्यांच्या किमतीही वाढू लागल्या आहेत.
कारागिरांच्या मते, यापूर्वी चांदीची जरी सुमारे चार हजार रुपये किलो दराने मिळत होती. सध्या त्याच जरीचा दर सुमारे साडेपाच हजार रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तसेच रेशीम धाग्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी सुमारे पाच हजार पाचशे रुपये किलो असलेले रेशीम आता सात हजार रुपयांपर्यंत गेले आहे. (sarees) त्यामुळे साडी तयार करण्याचा एकूण खर्च वाढला असून त्याचा परिणाम बाजारातील किमतींवर दिसत आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाही वाढलेल्या किमतींमुळे अनेक ग्राहक खरेदी करताना विचार करत आहेत. दुसरीकडे, उत्पादन खर्च वाढल्यामुळे कारागीर आणि विक्रेत्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पैठणी ही केवळ साडी नसून महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा मानली जाते. (sarees) त्यामुळे सोन्या-चांदीचे दर कमी होऊन पैठणी पुन्हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावी, अशी अपेक्षा ग्राहकांसह कारागिरांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
आयपीएल 2026 स्पर्धेत मोठा बदल होणार! 10 सामन्यांबाबत होणार निर्णय
सावधान! उष्णतेची मोठी लाट, मुंबईलाही ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर!
कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार