मध्य-पूर्वेतील ताणतणावात भारतातील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. देशातील अनेक भागात एलपीजी सिलेंडरची टंचाई, तुटवड्याने ग्राहकांना हैराण केले आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. त्यात NRAI ने मोठी घोषणा केली आहे.

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम भारतावर झाला. एलपीजी सिलेंडरच्या पुरवठा विस्कळीत झाला. देशातील अनेक शहरात आणि खेड्यात एलपीजी गॅसची टंचाई झाली. सर्वसामान्यांपासून ते रेस्टॉरंट मालक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याने हैराण झाले. (cylinder) काही ठिकाणी एलपीजी गॅसच्या काळाबाजाराच्या तक्रारीने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. होर्मुज स्ट्रेट बंद झाल्याने पुरवठा थांबला आहे. त्याचा संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे.

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि कोलकाता सारख्या मेट्रो शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटला व्यावसायिक सिलेंडर मिळण्यात मोठी अडचण होत आहे. रेस्टॉरंट असोसिएशननुसार गेल्या काही दिवसांपासून पुरवठा अनियमित होताच आता तो पूर्णपणे बंद झाला आहे. आता चुली पेटवण्याशिवया पर्याय उरला नाही. जर तेही मिळाले नाही तर अनेक पदार्थ तयार करणे बंद करावे लागेल. तसेच हॉटेल उघडण्याच्या वेळेतही बदल करावा लागेल, अशी भूमिका हॉटेल चालकांनी घेतली.

मुंबई हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन्सने कुकिंग गॅसचा पुरवठा न झाल्याने शहरातील 20 टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद झाल्याचे म्हटले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर मुंबईतील अर्ध्याहून अधिक हॉटेल्स लागलीच बंद होतील अशी भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे. (cylinder) दरम्यान देशातील परिस्थिती पाहता सरकारने तेल उत्पादक कंपन्यांना एलपीजीचे उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे. तर इतर देशाकडून नैसर्गिक वायू खरेदी करण्यावरही भर देण्यात येत आहे.

एका डीलरने दिलेल्या माहितीआधारे ने एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, घरगुती 14.2 सिलेंडर देशात उपलब्ध आहेत. पण रविवारपासूनच देशातील व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे रोडावला. त्यात मोठी कपात झाली. तर आता व्यावसायिक सिलेंडरची खेप आलीच नाही. त्यामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल चालकांना मोठा फटका बसला आहे. (cylinder) तर काही ठिकाणी हॉटेल चालकांनी काळ्या बाजारातून गॅस खरेदी केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. देशातील काही भागात एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करणारे ट्रक अचानक गायब झाल्याने हे सिलेंडर काळ्या बाजारात विक्री होण्यासाठी हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने रेस्टॉरंट आणि हॉटेल मालकांना आगाऊ सूचना दिली आहे. आता गॅस सिलेंडरवर अवलंबून न राहता पर्यायी इलेक्ट्रिक अथवा सौर ऊर्जावरील पर्यांयाचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे अजून अनेक दिवस गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची आशंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे इंडक्शन शेगडी पासून ते इलेक्ट्रिक पर्यायाकडे ग्राहक वळले आहेत.

हेही वाचा :

युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान

वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या

कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *