अमेरिका, इस्रायल आणि इराण देशात सुरू असणाऱ्या युद्धामुळे एलपीजी गॅल सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. तर केंद्र सरकारने देशभरात अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केला आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली आहे.

घरगुती गॅसचा अवैध वापर केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपुरातील सांगोला नाका इथं अवैध पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडर रिक्षात भरून विक्री केली जात होती. जिल्हा पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत घरगुती गॅसच्या 8 तर व्यावसायिक वापराच्या 5 टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. गणेश बोरीकर यांच्याविरोधात पंढरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (cylinders) त्याचबरोबर त्यांना गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीचा शोध भरारी पथक घेत आहेत. अवैध पद्धतीने गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर देखील अशाच पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन आणि सातनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे गोंदियातही हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्याची घटना समोर आली आहे. (cylinders) त्यानंतर जिल्हा प्रशासनाने दोन हॉटेल्सवर कारवाई केली आहे. या हॉटेल्समधून 7 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतात देखील बसत असून एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर होत असून हॉटेल व्यवसायिक घरगुती सिलेंडरचा वापर करत असल्याचं गोंदिया जिल्ह्यातही पहायला मिळालं. गोंदिया जिल्हा प्रशासनाने गोंदिया आणि तिरोडा या ठिकाणी दोन कारवाया केल्या असून यामध्ये 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. सध्या तरी गोंदिया जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात एलपीजी सिलेंडरचा साठा असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी केलं आहे.
केंद्र सरकारने देशभरात ‘अत्यावश्यक वस्त कायदा 1955’ लागू केल्यानंतर महाराष्ट्रात व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. याचा परिणाम थेट हॉटेल चालक आणि लहानमोठ्या उपहारगृहांवर होत आहे. आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्णाण झाल आहे. (cylinders) त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर देणं बंद करण्यात आलं असून घरगुती गॅस सिलेंडर नोंदणीची मुदत 25 दिवसांची करण्यात आली आहे.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर