अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा परिणाम भारतात झाला. या युद्धामुळे भारतात पुरवठा होणारा एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला. आता भारतामध्ये थेट मोठे परिणाम बघायला मिळत आहेत. यादरम्यानच प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला.

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. युद्धातील संघर्ष अधिक टोकाला पोहोचला आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ले करत आहे. तेहरान शहरामध्ये सर्वात जास्त नुकसान झाले. इराणच्या प्रमुख शहरांना टार्गेट करत हल्ला करण्यात आला. इस्त्रायलवर मोठे हल्ले इराण करत आहे. ज्या कोणत्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, (LPG gas) अशा ठिकाणीही मोठे हल्ले इराणकडून करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धाची झळ भारतापर्यंत पोहोचली. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद करण्याची वेळ सरकारवर आली. यामुळे हॉटेल व्यवसायावर घातक परिणाम दिसून येत आहे. हेच नाही तर थेट अनेक हॉटेल चालकांना ताळे लावण्याची वेळ आणि तर काहींनी चुलीचा सहारा घेतली.

युद्धाचे परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता, सरकार तीन महिन्यांचं धान्य रेशन दुकानांत पोहोचवणार आहे. राज्यभरातील 51 हजार पेक्षा जास्त रेशन दुकानांत तीन महिन्यांच धान्य उपलब्ध करून देणार आहे. स्वस्त धान्य दुकानांत एप्रिल, मे आणि जून महिन्याचा धान्यसाठा पोहोचवण्याच्या सुचना देण्यात आल्या. नागपूर जिल्ह्यातील 1900 स्वस्त धान्य दुकान तीन महिन्यांचा धान्यसाठा केला जाणारा आहे.

भविष्यात युद्धाचे परिणाम तीव्र होण्याच्या भितीने तीन महिन्यांचं धान्य वितरण होणार. नागपूर जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये महिन्याला 16 हजार मेट्रिक टन धान्य साठ्याची गरज आहे. गहू आणि तांदळाचा तीन महिन्यांचा पुरवठा केला जाणार. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्य सरकार तीन महिन्यांचं धान्य एकाच वेळीस दुकानात पाठवणार. युद्धामुळे डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यास धान्य वितरणात अडथळा येण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा वाहनांमध्ये बेकायदेशीर वापर करणाऱ्यांवर वाहनांवर आरटीओ विभागाने मोठी कारवाई केली आहे. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान तब्बल 80 वाहने जप्त करण्यात आली (LPG gas) असून या कारवाईमुळे गॅसच्या काळाबाजाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तपासणीदरम्यान अनेक वाहनांमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले.

संबंधित वाहनधारकांना तात्काळ सिलिंडर काढून घेण्याचे आदेश देण्यात आले असून, भविष्यात अशा प्रकारे घरगुती गॅसचा वापर करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. जिल्ह्यात घरगुती गॅसचा साठा मर्यादित असल्याने आणि वाहनांमध्ये त्याचा गैरवापर होत असल्याने गॅसचा काळाबाजार वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. (LPG gas) त्यामुळे या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा :

युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान

वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या

कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *