बहुतेकवेळा चुकीच्या पद्धतीने कपडे धुतल्याने कपड्यांचा रंग फिकट होतो शिवाय कपड्यांना सुरकूत्या पडतात. त्यामुळे कपडे धुताना काही सोप्या खबरदारी लक्षात ठेवल्याने सुरकुत्या टाळता येतात आणि कपड्यांचा रंग देखील टिकून राहतो. चला कोणत्या आहे या टिप्स जाणून घेऊयात.

अनेकदा काही कपडे धुतल्यानंतर त्यांना सुरकुत्या पडतात, ज्यामुळे ते सुकल्यावर प्रत्येक कपड्याला इस्त्री करावी लागते. तर काही वेळा कपडे धुतल्यानंतर कपड्यांचा रंगही फिकट होतो तेव्हा आपण कापड चांगल नाहीये म्हणत कपड्यांना दोष देत असतो. पण कधीकधी आपली कपडे धुण्याची पद्धत सुद्धा तितकीच जबाबदार असते. (color) ज्यामुळे कपड्यांना सुरकुत्या पडणे त्यांचा रंग कमी होऊन कपडे फिकट दिसणे. मात्र कपडे धुताना तुम्ही जर या चुका टाळल्यास आणि छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पहिजेत. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कपडे धुताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.
तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी जास्त अतिरिक्त कपडे धुण्यास टाकता का? जेव्हा वॉशिंग मशीन किंवा ड्रायर ओव्हरलोड करता तेव्हा कपड्यांना त्यात फिरण्यासाठी पुरेशी जागा नसते. यामुळे कपडे गुंतले जातात आणि धुण्याची आणि वाळवण्याची प्रक्रिया केवळ कापडाचे तंतू ताणत नाही तर सुरकुत्या देखील निर्माण करतात. मशीनवरील सूचनांनुसार नेहमी मशीनमध्ये त्याप्रमाणातच कपडे धुण्यास टाका.
कपडे धुण्याची एक सामान्य चूक म्हणजे घरातील प्रत्येकाचे कपडे एकत्र धुण्यासाठी टाकणे. तुम्ही फक्त कपड्याचा रंग जातोय म्हणून वेगळे धुता पण कापडानेही कपडे वेगळे करून धुतले पाहिजेत. जेव्हा तुम्ही मऊ कापड आणि जीन्स सारख्या जड असलेले कापड एकत्र मशीन मध्ये धुवायला टाकता तेव्हा ते तीव्र घर्षण निर्माण करते आणि मऊ कापड लवकर झिजते. शिवाय, प्रत्येक कापडासाठी हलका किंवा जड डिटर्जंट आवश्यक असतो, (color)म्हणून कपड्यांच्या पद्धतीनुसार कपडे धुवावेत.
आपल्यापैकी अनेकजण कपडे धुवून झाल्यानंतर पिळून तसेच ठेवतात व काहीवेळाने ते कपडे सुकण्यास टाकतात. पण यामुळे कपड्यांना सुरकुत्या पडतात. अशावेळेस तुम्ही जेव्हा कपडे हाताने पिळता तेव्हा ते लगेच हलके झटकून हॅन्गरवर लटकवावेत. आणि जर तुम्ही ते ड्रायरमध्ये वाळवले असतील तर ते लगेच बाहेर काढा आणि वाळत टाका.
कपड्यांमधील घाण पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण कपडे डिटर्जंट पाण्यात भिजत ठेवतात. पण कपडे जास्त वेळ भिजवून ठेवू नका याची काळजी घ्या. अनेकदा रात्रभर कपडे भिजवून ठेवतात (color) यामुळे केवळ कपड्यांची घाण निघून जात नाही तर कपड्यांचा रंगही फिकट होतो. कपडे साधारणपणे 1 ते 2 तास भिजवून ठेवणे पुरेसे असते.
कपड्यांच्या साफसफाईसाठी अनेकदा गरम पाण्याचा वापर केला जातो, परंतु यासाठी देखील तापमानाचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे. खूप गरम पाण्यामुळे तुमचे कपडे आकुंचन पावू शकतात, फॅब्रिक कमकुवत होऊ शकते आणि लवकर फिकट होऊ शकते, ज्यामुळे महागड्या वस्तू देखील काही दिवसांनी जुने असल्यासारखे दिसू शकतात.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर