जगभरात तेलाचे दर वाढत असतानाच घरगुती आणि व्यावसायिक वापरातील गॅस सिलिंडरचा तुटवडा एक नवं संकट घेऊन आला आणि त्यातच आता आणखी एका संकटाची भर पडली. ज्यामुळं ही संकटाची साखळी काही संपताना दिसत नाहीय.

अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेला हल्ला आणि त्यानंतर उद्भवलेली युद्धजन्य परिस्थिती पाहता, हे संकट जगातील इतरही देशांवर थेट परिणाम करताना दिसत आहे आणि भारतालाही यामुळं झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता एका नव्या संकटाची भर पडणार असल्याचं म्हटलं गेल्याचं पाहून चिंता वाढल्याचं चित्र आहे. अमेरिकेच्या दाव्यानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणच्या नौदलानं सुरूंग लावल्यामुळं अमेरिकेनं इथं प्रतिहल्ला केला. (domestic) ज्यामध्ये 16 इराणी जहाजांना लक्ष्य करण्यात आलं. ब्रिटनच्या दाव्यानुसार या हल्ल्यात देशाचं एक व्यापारी जहाजही यामध्ये उद्ध्वस्त झालं.
उपलब्ध माहितीनुसार अमेरिकेच्या या हल्ल्यात तीन व्यापारी जहाजांचं मोठं नुकसान झालं, (domestic) ज्यामुळं या मिसाईल हल्ल्यानं कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर आणखी गंभीर होणार असल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे. मध्यपूर्वेतील या युद्धजन्य स्थितीचा परिणाम भारतात थेट सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होताना दिसत असून, इंधनच नव्हे, तर दूरसंचार क्षेत्र अर्थात टेलिकॉम सेक्टरवरही याचा परिणाम होताना दिसणार आहे.
या तणावाच्या परिस्थितीत येत्या काळात मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेट सेवांमध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो असा इशारा डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर प्रोवायडर्स असोसिएशन अर्थातनं त्याबाबतचा इशारा दिला असून, टेलिकॉम टॉवर बनवणाऱ्या कंपन्यांना केला जाणारा एलपीजी पुरवठाही थांबवण्यात आल्यामुळं या अडचणी आणखी गंभीर स्वरुप धारण करताना दिसत आहेत.
भारतात केंद्र शासनाच्या आदेशानंतर तेल उत्पादन कंपन्यांनी 5 मार्च 2026 पासून टॉवर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सना केला जाणारा एलपीजी पुरवठा थांबवला. सरकारच्या आदेशानुसार सध्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून खरेदी करण्यात आलेला गॅस हा फक्त घरगुती वापरातील गॅस निर्मितीसाठीच वापरण्यात यावा.
एलपीजी आणि मोबाईल टॉवरचा संबंध काय असाच प्रश्न तुमच्याही मनात घर करून गेला असेल. तर, टॉवर बनवण्याच्या या प्रक्रियेमध्ये ‘गॅल्वनायझेशन’ म्हणजेच लोखंडाला गंज लढू नये यासाठी त्यावर जस्ताचा एक मोठा थर चढवला जातो. या कामादरम्यान भट्ट्या गरम ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात एलपीजीची गरज भासते. मात्र येत्या काळात हा पुरवठा थांबवल्यामुळं कारखान्यांमधील कामावर त्याचा थेट परिणाम होणार असून, हा प्लांट पूर्णपणे बंद झाला, तर तो पुन्हा सुरू करण्यासाठी प्रचंड वेळ दवडला जाऊ शकतो.
सामान्यांवरही या आदेशामुळं थेट परिणाम होण्याची शक्यता असू,न हा बदल दैनंदिन व्यवहारांवरही प्रभाव टाकू शकतो. जर मोबाईल टॉवर कार्यान्वित राहिले नाहीत, तर त्यामुळं रोलआऊट आणि नेटवर्क कवरेज वाढवण्याचं काम प्रचंड धीम्या गतीनं होईल. वीजपुरवठा खंडीत झाल्यास टॉवर सुरू ठेवण्यासाठी इंधनाचीही कमतरता असल्यानं मोबाईल नेटवर्क अचानक दिसेनासेही होण्याची भीती आहे. इंटरनेटसेवांवर परिणाम झाल्यामुळं भविष्यात ऑनलाईन पेमेंट, हेल्थकेअर आणि तत्सम सेवांवर वाईट परिणाम होईल. (domestic) ज्यामुळं आता केंद्रानंही हे संकट आणखी गंभीर स्वरुप धारण करु नये यासाठी आवश्यक ती पावलं उचलत सामान्यांना या संकटाच्या झळांपासून शक्य तितकं दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर