डिजिटल पेमेंटचा वापर देशात झपाट्याने वाढत आहे. दिल्लीपासून ते छोट्या गावांपर्यंत बहुतांश व्यवहार आता मोबाईलवरून केले जात आहेत. चॉकलेटसारख्या छोट्या खरेदीपासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत, बस-रेल्वे प्रवासापासून पेट्रोल पंपावरील बिलापर्यंत सर्व ठिकाणी QR कोड स्कॅन करून पैसे देण्याची पद्धत सर्वसामान्य झाली आहे. मात्र या सोयीसोबतच फसवणुकीचे प्रकारही वाढताना दिसत आहेत.

अनेक ठिकाणी भामटे मूळ QR कोडवर दुसरा बनावट QR कोड चिकटवतात. ग्राहकाने तो कोड स्कॅन करून पेमेंट केल्यास पैसे थेट दुकानदाराकडे न जाता फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात जातात. (payments) त्यामुळे QR कोड स्कॅन करण्यापूर्वी तो खरा आहे की नाही याची खात्री करणे अत्यंत आवश्यक ठरते.

पेमेंट करताना मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारे नाव नीट तपासणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय मानला जातो. स्कॅन केल्यानंतर स्क्रीनवर जे नाव दिसते ते दुकानदाराच्या नावाशी जुळते का, याची खात्री करावी. नाव वेगळे दिसत असल्यास लगेच दुकानदाराला विचारणा करावी. अन्यथा तुमचे पैसे चुकीच्या खात्यात जाऊ शकतात. (payments) याशिवाय पेमेंट करताना घाई करणे टाळणेही महत्त्वाचे आहे. QR कोड स्कॅन होताच लगेच ‘पे’ बटण दाबण्याऐवजी काही क्षण थांबून सर्व माहिती तपासणे आवश्यक आहे. दोन-तीन मिनिटे खर्च केल्यास मोठी फसवणूक टाळता येऊ शकते.

काही वेळा QR कोड तिरपा, अस्पष्ट किंवा व्यवस्थित न लावलेला दिसतो. अशा वेळी तो कोड खरा आहे का याची दुकानदाराकडून खात्री करून घेणे आवश्यक आहे. शंका वाटल्यास दुसरा कोड वापरणे किंवा थेट खात्यावर पैसे ट्रान्सफर करणे अधिक सुरक्षित ठरू शकते. डिजिटल व्यवहार सोयीस्कर असले तरी सावधगिरी बाळगणे तितकेच गरजेचे आहे. थोडी काळजी घेतली (payments) तर QR कोडच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक सहज टाळता येऊ शकते.

हेही वाचा :

युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान

वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या

कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *