अनेकदा माणूस खूप मेहनत करून पैसा कमावतो, मात्र तो पैसा टिकत (working hard) नाही. बचत करण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही कारणाने खर्च वाढत जातो. काही जण कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत राहतात, पण कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच जाते. अनेकदा आयुष्य सुरळीत सुरू असताना अचानक मोठे आर्थिक संकट समोर येते आणि माणूस हताश होतो. अशा वेळी बहुतांश लोक आपल्या नशिबाला दोष देतात. मात्र काही तज्ज्ञांच्या मते या समस्यांमागे केवळ नशीब जबाबदार नसते, तर घरातील वास्तुदोषही त्यामागे कारणीभूत असू शकतो.

वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जा (working hard) संतुलित नसेल, काही दिशांमध्ये अडथळे असतील किंवा घराची मांडणी चुकीची असेल तर त्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर, कुटुंबातील वातावरणावर आणि आरोग्यावरही होऊ शकतो. घरात वारंवार आर्थिक अडचणी येणे, कोणत्याही कारणाशिवाय सतत भांडणे होणे, कुटुंबातील एखाद्या सदस्याला वारंवार आजारपण येणे किंवा कर्जाचा भार कमी न होणे ही काही लक्षणे वास्तुदोषाशी संबंधित असल्याचे मानले जाते.
वास्तुशास्त्रात अशा परिस्थितीत काही सोपे धार्मिक आणि पारंपरिक (working hard) उपाय सांगितले गेले आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तींनी दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी, असे सांगितले जाते. या दिवशी भगवान विष्णूंना हरभऱ्याची डाळ आणि गूळ अर्पण केल्यास कर्जाशी संबंधित अडचणी कमी होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच शनिवारी गरजू व्यक्तींना काळे तीळ दान केल्यास शनीदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील अडथळे कमी होतात, असेही मानले जाते.
धनप्राप्तीसाठीही वास्तुशास्त्रात (working hard) काही गोष्टींवर विशेष भर देण्यात आला आहे. घराची उत्तर दिशा स्वच्छ आणि मोकळी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिशेला भंगार किंवा रद्दी साठवू नये, कारण ही दिशा धनाचे अधिपती कुबेर यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. घराच्या उत्तर दिशेला कुबेर यांचे चित्र लावणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून तिची नियमित पूजा केल्यास घरात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे.
याशिवाय काही पारंपरिक नियमही सांगितले गेले आहेत. सायंकाळच्या वेळी मीठ किंवा काही विशिष्ट वस्तूंचे दान टाळावे, असेही वास्तुशास्त्रात नमूद केले आहे. या सर्व उपायांमुळे घरातील नकारात्मकता कमी होऊन आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते, अशी अनेकांची श्रद्धा आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय