बँक तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा कशी ठरवते? उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि खर्चाच्या सवयी यांसारख्या महत्त्वाच्या घटकांविषयी सविस्तर जाणून घ्या.

आजच्या काळात क्रेडिट कार्ड हे केवळ प्लास्टिक कार्ड उरले नसून ते अनेकांच्या दैनंदिन आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ऑनलाईन शॉपिंग असो, प्रवासाचे बुकिंग असो किंवा आपत्कालीन खर्च अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करताना दिसतात. मात्र अनेकदा दोन व्यक्तींचे उत्पन्न सारखे असूनही त्यांच्या कार्डची क्रेडिट लिमिट वेगवेगळी असल्याचे पाहायला मिळते. तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा किती असेल, हे कसे ठरते? बँका ही मर्यादा नक्की कशी ठरवतात, असा प्रश्न अनेकांना पडतो.(Credit Card) आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत. बँक कोणत्याही ग्राहकाला क्रेडिट कार्ड देण्यापूर्वी त्यांच्या संपूर्ण आर्थिक प्रोफाईलचे सखोल मूल्यांकन करते. यामध्ये प्रामुख्याने काही महत्त्वाच्या घटकांचा विचार केला जातो.
उत्पन्न आणि नोकरीची स्थिरता क्रेडिट कार्ड मर्यादा ठरवताना ग्राहकाचे मासिक उत्पन्न किती? हा सर्वात महत्त्वाचा आधार असतो. तुमचा पगार किंवा व्यवसायातील नफा जितका जास्त, तितकी तुम्हाला क्रेडिट कार्डची मर्यादा जास्त मिळण्याची शक्यता असते. तसेच, तुम्ही किती काळ एकाच कंपनीत कामाला आहात किंवा तुमचा व्यवसाय किती जुना आहे, यावरून तुमची आर्थिक स्थिरता मोजली जाते.
क्रेडिट स्कोअर तुमचा क्रेडिट स्कोअर हा तुमच्या मागील आर्थिक व्यवहारांचा आरसा असतो. जर तुमचा स्कोअर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर बँक तुम्हाला कमी जोखमीचा ग्राहक मानते. (Credit Card) ज्यांचा स्कोअर खराब असतो किंवा ज्यांनी यापूर्वी बिल भरण्यास उशीर केला आहे, अशा ग्राहकांना बँका कमी मर्यादा देतात किंवा कार्ड नाकारतात.
सध्याची कर्जे आणि जबाबदाऱ्या त्यासोबतच बँका तुमच्या उत्पन्नाचा किती भाग सध्याच्या गृहकर्ज, कार लोन किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआय मध्ये जात आहे, हे देखील तपासते. जर तुमच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा कर्जाचे हप्ते भरण्यात जात असेल, तर तुमची परतफेड क्षमता कमी मानली जाते. (Credit Card) यामुळे तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा मर्यादित ठेवली जाते.
क्रेडिट युटिलायझेशन रेशो तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एकूण मर्यादेच्या फक्त ३० ते ४० टक्के हिस्सा वापरणे हे चांगल्या आर्थिक आरोग्याचे लक्षण आहे. जर तुम्ही सतत क्रेडिट कार्डची पूर्ण मर्यादा वापरत असाल, तर तुम्ही क्रेडिट हंग्री (कर्जावर अवलंबून असलेले) आहात असा संदेश बँकेला जातो. जे ग्राहक जबाबदारीने कार्ड वापरतात, त्यांची मर्यादा बँक स्वतःहून वाढवण्याची ऑफर देते.
थोडक्यात सांगायचे तर, केवळ उत्पन्न जास्त असून चालत नाही, तर तुमचे आर्थिक शिस्त आणि परतफेडीचा इतिहास यावरच तुमच्या क्रेडिट कार्डची क्रेडेबिलिटी आणि मर्यादा अवलंबून असते.
हेही वाचा :
एप्रिलमध्ये तुमचं बँक खातं फ्रीज होणार? आर्थिक संकटामुळे सरकार तुमचे पैसे गोठवणार?
मोनालिसा लव्ह जिहादची शिकार? मुस्लीम बॉयफ्रेंडशी लग्न केल्याने दावा; नेमकं सत्य काय?
खेळपट्ट्यांबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, आता असं करता येणार नाही