उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातून एक चकीत करणारी घटना समोर आली आहे. (shocking incident) मृत घोषित करण्यात आलेली एक महिला रुग्णवाहिकेत नेत असताना अचानक श्वास घेऊ लागली आणि नंतर उपचारांनंतर पूर्णपणे बरी झाली. या घटनेमुळे “काळ आला होता पण वेळ आली नव्हती” अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

पीलीभीत न्यायालयात काम करणाऱ्या ५० वर्षीय (shocking incident) विनीता शुक्ला यांना २२ फेब्रुवारी रोजी अचानक चक्कर येऊन त्या घरातच कोसळल्या. त्यावेळी त्यांचा रक्तदाब वाढलेला होता. त्यांनी औषध घेतले होते, मात्र काही वेळातच त्या बेशुद्ध झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारांसाठी त्यांना बरेली येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
बरेलीतील रुग्णालयात दोन दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी (shocking incident) कुटुंबीयांना सांगितले की, रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि त्यांना वाचवण्याची शक्यता फार कमी आहे. डॉक्टरांनी त्यांना जवळपास ब्रेन डेड असल्याचे सांगितले आणि घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कुटुंबीयांनी अंतिम संस्काराची तयारी करण्यासाठी विनीता यांना रुग्णवाहिकेतून घरी नेण्याचा निर्णय घेतला.
रुग्णवाहिका (shocking incident) बरेली-हरिद्वार राष्ट्रीय महामार्ग NH-74 वरून जात असताना अचानक एका मोठ्या खड्ड्यात गेल्याने वाहनाला जोरदार धक्का बसला. त्या धक्क्यानंतर काही क्षणांतच विनीता शुक्ला यांनी अचानक श्वास घेण्यास सुरुवात केली, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. हा प्रकार पाहून रुग्णवाहिकेत असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.
यानंतर त्यांना तातडीने पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. न्यूरो सर्जन डॉ. राकेश सिंह यांनी त्यांची सखोल तपासणी केली. तपासणीत त्यांच्या शरीरात न्यूरोटॉक्सिन आढळून आले. हे विष साप किंवा एखाद्या कीटकाच्या दंशामुळे शरीरात गेले असावे, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. त्या वेळी त्यांच्या ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस दिसत नव्हते आणि ग्लासगो कोमा स्केलवर त्यांचा स्कोर फक्त ३ होता, ज्यामुळे त्या पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले होते.
डॉ. राकेश सिंह यांनी योग्य उपचार सुरू केल्यानंतर हळूहळू त्यांच्या प्रकृतीत (shocking incident) सुधारणा होऊ लागली. सुमारे एका आठवड्यानंतर त्यांनी स्वतः श्वास घेण्यास सुरुवात केली आणि पुढील काही दिवसांत त्या पूर्णपणे शुद्धीवर आल्या. सुमारे दहा दिवस उपचार घेतल्यानंतर विनीता शुक्ला यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
घटनेनंतर विनीता (shocking incident) शुक्ला यांनी सांगितले की, त्यांना रक्तदाब वाढल्यामुळे गोळी घेतल्याचे आठवते, पण त्यानंतर काय झाले याची काहीही आठवण नाही. त्या आता पूर्णपणे स्वस्थ असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबीयांनीही डॉक्टरांचे आभार मानत त्यांना देवासारखे असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून अनेकजण याला चमत्कारिक घटना मानत आहेत.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर