Iran आणि United States यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग (ongoing war) चिंतेत आहे. युद्ध थांबावे, अशी अपेक्षा जगातील बहुतेक देश व्यक्त करत आहेत. कारण या संघर्षाचा परिणाम केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि ऊर्जा पुरवठ्यावरही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. युद्धाला आता पंधरा दिवस पूर्ण झाले असून या काळात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी भारतासह अनेक देशांमध्ये इंधन आणि एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे.

दरम्यान, जागतिक बाजारात (ongoing war) तेलाच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर Russia वर लादण्यात आलेले काही निर्बंध सैल करण्याचा निर्णय United States ने घेतल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. युद्धामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.

याचदरम्यान Iran कडूनही कठोर भूमिका घेण्यात आली आहे. तेलाच्या (ongoing war) किंमती कोण ठरवणार याबाबत इराणने अमेरिकेला थेट इशारा दिला असून, या निर्णयात अमेरिकेचा नाही तर इराणचा प्रभाव असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच इराणने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा Strait of Hormuz मार्ग बंद केल्याने जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. हा मार्ग बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर थेट परिणाम झाला असून तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये हल्ले आणि प्रत्युत्तरांचे सत्रही सुरूच आहे. अमेरिकेने इराणच्या महत्त्वाच्या बेटांवर मोठे हल्ले करून तेथील पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. त्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत अमेरिकेला मोठा धक्का दिला. हा हल्ला अमेरिकेला अपेक्षित नव्हता, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहे.

दरम्यान, Prince Sultan Air Base या सौदी अरेबियातील अमेरिकन लष्करी (ongoing war) तळावर इराणकडून पुन्हा एकदा मोठा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अमेरिकेच्या हवाई दलाच्या इंधन भरणाऱ्या विमानांना मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. लढाऊ विमानांना इंधन भरले जात असतानाच हा हल्ला करण्यात आल्याने अमेरिकन लष्करात खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यानंतर दोन्ही (ongoing war) देशांमधील तणाव आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांना लक्ष्य करत इराणकडून सातत्याने हल्ले होत असल्याचे वृत्त समोर येत आहे. दुसरीकडे Israel कडूनही इराणवर हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. मात्र या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये नाराजी वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः मध्यपूर्वेतील काही देश अमेरिकेच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत असल्याचेही सांगितले जात आहे.

सध्याची परिस्थिती पाहता हा संघर्ष लवकर थांबला नाही तर जागतिक स्तरावर मोठ्या आर्थिक आणि मानवी संकटाची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न वाढवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

हेही वाचा :

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *