Shivaji University च्या कोल्हापूर येथील परिसरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची (groundwater) योग्य यांत्रिक प्रक्रिया केली जात नसल्यामुळे कॅम्पसमधील भूजल प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नुकत्याच झालेल्या सिनेट बैठकीत (groundwater) कॅम्पसमध्ये दररोज तयार होणारे सांडपाणी, मैला तसेच प्रयोगशाळांमधील रासायनिक पदार्थांची विल्हेवाट कायद्याच्या तरतुदीनुसार केली जाते का, तसेच त्यासाठी आवश्यक पर्यावरण परवाने घेतले आहेत का, याबाबत प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आले. प्रशासनाकडून मिळालेल्या उत्तरांमुळेच कॅम्पसमधील भूजल प्रदूषित होण्याची भीती अधिक वाढल्याचे सदस्यांनी सांगितले.
विद्यापीठ परिसरात दररोज सुमारे चार लाख लिटर सांडपाणी निर्माण होत (groundwater) असून त्यामध्ये प्रयोगशाळांमधील घातक रसायनांचाही समावेश असतो. मात्र या रसायनांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असलेला इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ईटीपी) विद्यापीठाने अद्याप उभारलेला नाही, असा आरोप अधिसभा सदस्य Amit Jadhav यांनी केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी थेट जमिनीत मुरत असल्याने भूजल पातळी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा दीर्घकालीन परिणाम विद्यापीठ परिसरासह पंचगंगा खोऱ्याच्या पर्यावरणावर होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
पर्यावरण विषयावर शिक्षण देणाऱ्या विद्यापीठानेच पर्यावरण नियमांकडे (groundwater) दुर्लक्ष करणे हे दुर्दैवी असल्याची टीका अधिसभा सदस्य Abhishek Mithari यांनी केली. विद्यापीठात पर्यावरण शास्त्र विभाग असून प्रत्येक शाखेत पर्यावरण विषय शिकवला जातो. सेमिनार आणि व्याख्यानांमधून पर्यावरण संरक्षणाचे धडे दिले जातात; मात्र प्रत्यक्षात नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.
सिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित (groundwater) झाल्यानंतर प्रशासनाने आवश्यक पर्यावरण परवाने घेऊन ईटीपी आणि एसटीपीसारख्या प्रक्रिया यंत्रणा उभारण्याचे तसेच विनाप्रक्रिया सांडपाणी जमिनीत मुरू न देण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील दोन महिन्यांत ठोस पावले उचलली नाहीत तर प्रशासनाविरुद्ध कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशाराही ॲड. मिथारी यांनी दिला.
दरम्यान, प्रशासनाने सेप्टिक टॅंक असल्याचा दावा केला असला तरी सेप्टिक टॅंक आणि सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) यामध्ये मोठा फरक असल्याचे अधिसभा सदस्य Ajit Patil यांनी स्पष्ट केले. कॅम्पसमध्ये एसटीपी पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याचे दिसून येते, तर कंपोस्ट यार्डही अनेक वर्षांपासून बंद असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून प्रशासनाने चुकीची माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाबाबत अनेक त्रुटी असल्याचे (groundwater) अधिसभा सदस्य Abhijit Kapse यांनीही सांगितले. कॅम्पसमधील प्रदूषण रोखण्यासाठी ईटीपी आणि एसटीपी उभारणीसाठी अंदाजपत्रकात तरतूद नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. यापुढे पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा विचार प्रशासनाने करावा, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?