‘राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आठ हजार नवीन बसेस खरेदी (new buses) केल्या जाणार आहेत. त्यापैकी तीन हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पाच हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला मंत्री सरनाईक यांनी उत्तर दिले.

एसटीच्या ताफ्यात (new buses) नवीन आठ हजार बसेसची खरेदी करून नवीन बसस्थानकांची उभारणी तसेच दुरुस्तीसाठी सन २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात दोन हजार ४६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, या बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे निधी खर्च होऊ शकला नाही.

नवीन बस खरेदी आणि बसस्थानकांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या (new buses) दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे? असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला.

मंत्री सरनाईक म्हणाले, ‘वाहन खरेदी भांडवली प्रकारची असून मोठ्या रकमेची असते. ही बाब लक्षात घेता एसटीच्या आठ हजार नवीन बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया रखडली असे म्हणता येणार नाही.’

हेही वाचा :

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *