कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील आलास गावच्या माळभागात बंद घर (The thieves) फोडून चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले असून सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत नेला आहे. या चोरीत सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना बांधकाम कंत्राटदार दादा (The thieves) निशानदार यांच्या घरी घडली. निशानदार हे गुरुवारी संकेश्वर येथे पाहुण्यांच्या गावी गेले होते. दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. आज ते गावाहून परत आल्यानंतर घराचे कुलूप व कडी-कोयंडा उचकटलेले दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील कपडे व अन्य साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले.
चोरट्यांनी कपाटामधील सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि अंदाजे १५ तोळे चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच घरात बसवलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत घेऊन गेल्याने तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच (The thieves) निशानदार यांनी तत्काळ कुरुंदवाड पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. इचलकरंजीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड आणि सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
तपासासाठी फॉरेन्सिक लॅब, ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला देखील पाचारण (The thieves) करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजू पाटील, मारुती गावडे, पोलिसपाटील केरबा भोई, बीट अंमलदार ज्ञानदेव सानप आणि सायबरतज्ज्ञ सागर खाडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?