मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना (beneficiaries) जानेवारी महिन्यानंतर आर्थिक मदत मिळालेली नसल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र राज्य सरकारने याबाबत स्पष्टता देत सांगितले आहे की, योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या महिलांनाच नवीन आर्थिक वर्षात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी १५०० रुपये मिळणार आहेत. ही रक्कम १५ एप्रिलपूर्वी लाभार्थींच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यात या (beneficiaries) योजनेच्या सुरुवातीला ११ लाख २० हजार ५६३ महिला लाभार्थी म्हणून नोंदल्या गेल्या होत्या. त्यानंतर शासनाने निकषांनुसार सर्व लाभार्थींची सविस्तर पडताळणी केली. या प्रक्रियेदरम्यान केंद्र किंवा राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, पुरुष लाभार्थी, एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी, कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिला तसेच २१ वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. पडताळणीनंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे तीन लाख महिला या योजनेतून वगळल्या गेल्या आहेत.

योजनेच्या शेवटच्या टप्प्यात सर्व लाभार्थी महिलांसाठी ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक करण्यात आले होते. ई-केवायसीच्या प्रक्रियेत लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्या महिलांनाही अपात्र ठरवले जाणार आहे. या निकषांनुसार सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे दीड लाखांहून अधिक महिला योजनेतून वगळल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शासनाने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाभार्थींना तीन महिन्यांची मुदत दिली (beneficiaries) होती. मात्र या कालावधीतही सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. या महिलांना पुन्हा मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा होती. दरम्यान शासनाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी ती फक्त ई-केवायसीमध्ये तांत्रिक चुका झालेल्या महिलांसाठीच लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही, त्यांना पुढील लाभ मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

दरम्यान, राज्य (beneficiaries) शासनाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांमार्फत सर्व लाभार्थींची निकषांनुसार प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली असून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना वयाच्या ६५ वर्षांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *