पश्चिम आशियातील तणाव अद्याप कमी झालेला नाही. (eggs) अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण हा संघर्ष अजूनही सुरूच आहे. आखातातील तेल आणि गॅस पुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. भारताची आयात नाही तर निर्यातही प्रभावित झाली आहे. अन्नधान्य आणि फळांचा पुरवठा ठप्प झाला आहे. तर तेल आणि गॅस पुरवठ्यातील अडथळे दूर करण्यासाठी सरकारचे जोरकस प्रयत्न सुरू आहे. दरम्यान गॅस सिलेंडरसाठी गेल्या तीन दिवसांपासून ग्राहकांची सर्वत्र कसरत सुरू आहे. पण या युद्धाचा अंड्यांच्या किंमतीवर विपरीत परिणाम झाला नाही. उलट अंड्याचे भाव उतरले आहेत.

आखातीत देशात भारतातून अंड्यांची निर्यात करण्यात येते.(eggs) पण या निर्यातीत युद्धामुळे अडचण येत आहे. परिणामी अंड्यांची देशातील बाजारात किंमती उतरल्या आहेत. बंगळुरू येथील ठोक अंड्यांच्या किंमती जवळपास 7 रुपये प्रति अंड्याहून घसरून जवळपास 5 रुपये प्रति अंड्यांवर आली आहे. ठोक खरेदीदार आता जवळपास 500 रुपयांहून 100 अंडे खरेदी करू शकतात. तर किरकोळ बाजारात अंड्यांच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. आता एक अंडे 5.50 ते 6 रुपये दराने विक्री होत आहे. पूर्वी एक अंडे हे 8 ते 9 रुपयांना मिळत होते.
सुरक्षेची कारणे आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे संयुक्त अरब अमिरात, (eggs)ओमान, बहरीन आणि कतार या देशांशी सुरू असलेला व्यापार पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी अंड्यांची मोठी उपलब्धता झाली आहे. अंड्यांच्या किंमती घसरल्या आहेत. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण कुक्कुटपालन व्यावसायिकांपुढे मोठे आवाहन उभे राहिले आहे. निर्यात घसरल्याचा मोठा फटका त्यांना सहन करावा लागत आहे.
उद्योग जगतातील अंदाजानुसार, संकट वाढण्यापूर्वी भारतातून (eggs) आखाती देशांमध्ये प्रति दिवशी एक कोटी अंड्यांची निर्यात करण्यात येत होती. पण आता संघर्ष विकोपाला गेल्याने वाहतुकीसह निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. स्थानिक बाजारात अंड्यांचा मोठा पुरवठा करण्यात येत आहे. अंडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने बाजारात अंड्यांच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. भारतात उत्पादित जवळपास 80 टक्के अंडी ही आखाती देशात निर्यात करण्यात येतात. हिवाळ्यात अंड्यांची मागणी वाढते. तर उन्हाळ्यात अंड्यांची मागणी रोडवते. पण आता खवय्यांना अंड्यांचे भाव घसरल्याने रोजची सोय झाली आहे. त्यांना आता रोज विविध रेसिपी करून खाता येणार आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?