घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतोय का?,(domestic) यासाठी पुरवठा विभागाकडून शहरातील हॉटेल, अवैध गॅस भरणा केंद्र व हातगाड्यांवर तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पाच पथके नियुक्त करण्यात आली आहेत.इस्त्रायल-अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. त्याचे परिणाम देशातील गॅस सिलिंडर वितरणावर झाले आहेत. शहरासह जिल्ह्यातही एजन्सींसमोर रांगा दररोज वाढत आहेत.

सरकारने औद्योगिक व व्यावसायिक सिलिंडरच्या वापरास बंदी घातली आहे. (domestic) त्यामुळे घरगुती सिलिंडरचा काळाबाजार होऊन त्याचा व्यावसायिक वापर होतोय का, हे पाहण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे.यासाठी शहरात पाच पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक पुरवठा निरीक्षक व एका लिपिकाचा समावेश आहे. याचे संनियंत्रण अधिकारी म्हणून शहर पुरवठा अधिकारी सचिन काळे व करवीर तालुका पुरवठा अधिकारी विकास देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागतायत 3000 रुपये; कोल्हापुरात गॅसचा काळाबाजार जोरात, पाहा काय आहे धक्कादायक वास्तव!या पथकांनी काल रात्री उशिरापर्यंत व आज पहाटेपासून शहरातील हॉटेल, हातगाडीवाले व अवैध गॅस भरणा केंद्रांच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली; परंतु या ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे आढळले नाही. तरीही तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिकसाठी करू नये, (domestic) यासाठी पुरवठा विभागाकडून शहरातील सर्व हॉटेल व हातगाडीवाल्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. यामध्ये जर कोणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केल्याचे सापडल्यास संबंधितावर सिलिंडर जप्त करण्यासह फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.घरगुती गॅसचा काळाबाजार होऊ नये, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, शहर पुरवठा अधिकारी सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गॅस एजन्सींची तपासणी सुरू आहे. यामध्ये गॅसचे बुकिंग, उपलब्ध गॅस सिलिंडर व विक्री याची माहिती घेतली जात आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?