रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.(Megablock) तुम्ही दररोज रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. रेल्वे मार्गावरील देखभाल, दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.या कामांमुळे काही उपनगरी लोकल सेवा रद्द राहतील, तर काही गाड्या पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार असल्याने प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरूळ मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक राहणार आहे.

त्यामुळे ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान धावणाऱ्या अप (Megablock)आणि डाऊन ट्रान्स हार्बर लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहतील, असे सांगण्यात आले आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.प्रभादेवी येथील रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डरच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही उपनगरी लोकल सेवा रद्द राहतील, तर काही गाड्या दादर आणि बांद्रा येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील, तसेच चर्चगेट-प्रभादेवी आणि माटुंगा रोड-माहिम दरम्यान काही काळ लोकल सेवा बंद राहतील. या ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
प्रभादेवी ब्लॉकमुळे काही मेल-एक्सप्रेस गाड्या उशिराने धावणार आहेत.(Megablock) त्यामध्ये ट्रेन क्र. ०९१८४ वाराणसी- मुंबई सेंट्रल एक्सप्रेस २ तास. ट्रेन क्र. २२९४६ ओखा मुंबई सेंट्रल एक्सप्रेस १ तास ४५ मिनिटे, ट्रेन क. १२९२८ एकता नगर-दादर – एक्स्प्रेस १ तास, ट्रेन क्र. १२९०२ अहमदाबाद-दादर एक्सप्रेस १ तास, ट्रेन क. ०९०५२ भुसावळ – दादर एक्सप्रेस ४५ मिनिटे आणि ट्रेन क. २२९५३ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद एक्सप्रेस ३० मिनिटे उशिराने सुटणार आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?