सोशल मीडियावर अलीकडे महिलांच्या छेडछाडीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे.(woman) गेल्या काही काळात महिलांसोबत गैरकृत्याचे प्रकार वाढले असून आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. इजिप्तमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एका महिलेसोबत धक्कादायक कृत्य घडले आहे. या महिलेसोबत स्कूबा डायव्हिंग ट्रेनरने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले आहे. या महिलेचे नाव राशा मेडिएन असून तिने स्वत: तिच्या सोबत घडलेल्या धक्कादायक कृत्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राशा सांगते की, ती एक सोलो ट्रॅव्हलर आहे. तिने स्कूबा डायव्हिंग शिकण्यासाठी (woman) इजिप्तमध्ये एक क्लास लावला होता. यावेळी तिच्या ट्रेनरने तिच्यासोबत गैरकृत्य केले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, स्कूबा ट्रेनर राशाला चुकीच्या पद्धतीने स्पर्थ करण्याचा प्रयत्न करत आहे. राशा त्याच्यामुळे असवस्थ झाली होती. तिने त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. राशाने सांगितले की, ट्रेनरची नजर तिला पहिल्यापासूनच ठीक वाटत नव्हती. यामुळे तिने सतर्क राहून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तिने सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या महिलांना सावध राहण्याचा आणि अशा नराधमांना धड शिकवण्याचा सल्ला दिला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ राशाने तिच्या इन्स्टाग्राम हँडर वर शेअर केला आहे.(woman) या व्हिडिओवर सध्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहे. अनेक महिलांनी राशासोबत घडलेल्या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच संबंधित स्कूबा डायव्हिंग सेंटरविरुद्ध तक्रार करण्याचा सल्ला राशाला दिला आहे. सध्या याबाबत इतर कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र या व्हिडिओने सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वीही असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाल आहे. यामुळे पुन्हा एकदा जगभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला त्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेच सुरक्षित नाही का असा प्रश्न करत आहेत

हेही वाचा :

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *