उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील दोन वेळा आमदार राहिलेले भगवान शर्मा ऊर्फ गुड्डू पंडित यांच्याविरोधात बेंगळुरूमध्ये गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. 40 वर्षीय महिलेवर(woman) लैंगिक अत्याचार केल्याचा आणि विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला(woman) आपल्या अल्पवयीन मुलासह 14 ऑगस्ट रोजी गुड्डू पंडित यांच्या सांगण्यावरून उत्तर प्रदेशातून बेंगळुरू येथे आली होती. त्याच दिवशी माजी आमदाराने तिला शहरातील अनेक ठिकाणी फिरवले. यानंतर 16 ऑगस्ट रोजी ते चित्रदुर्ग येथे गेले आणि परतीच्या प्रवासात 17 ऑगस्ट रोजी केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी महिलेकरिता रुम बुक केली.

या हॉटेलमध्ये महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या महिलेने विरोध केल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून 17 ऑगस्ट रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि 356 (जीवे मारण्याची धमकी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यावेळी पोलिसांनी सांगितले की, महिलेने दाखल केलेल्या FIR नंतर तपास सुरू केला असून या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे.

भगवान शर्मा ऊर्फ गुड्डू पंडित यांचा जन्म 10 जुलै 1974 रोजी उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यात झाला. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बुलंदशहरच्या डिबाई मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भाजपचे उमेदवार राजवीर सिंह यांचा 15704 मतांनी पराभव करून पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतरही त्यांनी स्थानिक राजकारणात सक्रीय भूमिका बजावली आहे.

हेही वाचा :

हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला!

मोठी बातमी! पावसामुळे आज महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील शाळा बंद

50 हजार कोटींच्या ‘लेटरबॉम्ब’ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *