महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागांत तुफानी पावसाने धुमाकूळ घातला आहे. लाखो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली असून, मुंबई व उपनगरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. लोकल गाड्याही उशिराने धावत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने शाळा (Schools) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय
हवामान खात्याने मुंबई व आसपासच्या भागाला रेड अलर्ट दिला असून पुढील 12 ते 48 तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनांनी शाळांना(Schools) सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
कुठे कुठे शाळा बंद? :
– ठाणे महानगरपालिका हद्दीत सर्व शाळा बंद राहणार आहेत.
– कल्याण-डोंबिवलीतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
– पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
– मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रातील शाळांनाही सुट्टी जाहीर झाली आहे.
मुंबई महापालिका परिक्षेत्रातील खासगी, विनाअनुदानित, अनुदानित अशा सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा 19 ऑगस्ट रोजी बंद राहतील.
सरकार व प्रशासनाचे स्पष्टीकरण :
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवामान खात्याच्या सूचनांनुसार शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते. त्यानुसार पावसाचा धोका पाहून संबंधित जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा :
ऋषभ पंत दर महिन्याला 241 लोकांकडून 399 रुपये का घेतो? कारण आलं समोर
लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी
सगल 2000000 वर्ष पडत होता तुफान पाऊस! पृथ्वीचा इतिहास, भूगोल बदलवणारी सर्वात डेंजर घटना