आखाती देशांतील वाढता तणाव आणि इराण-इस्रायल युद्ध याचा परिणाम (Iran-Israel war) आता थेट भारतीय बाजारपेठेत जाणवू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयात साखळी विस्कळीत झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली असून याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात ही महागाई अधिक जाणवू लागली आहे.

मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये परिस्थिती (Iran-Israel war) अधिक तीव्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत १६० रुपये किलो दराने मिळणारे सूर्यफूल तेल आता १७३ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सूर्यफूल तेलाच्या तुटवड्यामुळे सोयाबीन तेलाची मागणी वाढली असून त्याचे दरही वाढले आहेत. घाऊक बाजारात १५ किलोच्या डब्यामागे ३० ते ४० रुपयांची वाढ नोंदवली जात आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात घाऊक दरात १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर पुण्यातील मार्केट यार्डमध्ये बाहेरील राज्यांतून येणारी आवक घटल्याने दर आणखी चढले आहेत.

सध्या राज्यातील विविध शहरांमध्ये खाद्यतेलाचे दर उच्चांकावर आहेत. सूर्यफूल तेल १७३ ते १७८ रुपये, सोयाबीन तेल १५३ ते १५९ रुपये, शेंगदाणा तेल १९० ते १९४ रुपये, पाम तेल १४५ ते १४८ रुपये, तर मोहरी तेल २०० रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे स्वयंपाकाचा खर्च लक्षणीय वाढला आहे.

दरम्यान, घाऊक महागाई निर्देशांकही वाढून फेब्रुवारी महिन्यात २.१३ टक्क्यांवर (Iran-Israel war) पोहोचला आहे, जो मागील ११ महिन्यांतील उच्चांक मानला जातो. भाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर असले तरी अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. कोकणातील हापूस आंब्याची मर्यादित आवक असल्याने त्याचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, ज्यामुळे येणारा गुढीपाडवा सण यंदा महाग ठरण्याची शक्यता आहे.

या दरवाढीमागे प्रमुख कारण (Iran-Israel war) म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले इंधन दर आणि वाहतूक खर्च. मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून त्याचा थेट परिणाम आयातीवर झाला आहे. काही ठिकाणी बंदरांवरील अडथळ्यांमुळे माल परत फिरवावा लागला, त्यामुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. याचबरोबर सणासुदीमुळे मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ झाल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. बासमती तांदूळ आणि साबुदाण्यासारख्या वस्तूंचे दरही वाढले असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडत आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *