राज्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत असतानाच (weather) वातावरणात अचानक मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. शनिवारी दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यात अचानक पावसाने हजेरी लावली. भर उन्हाळ्यात पडलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात (weather) दुपारनंतर अचानक काळे ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यानंतर मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटही ऐकू आला. अचानक बदललेल्या या वातावरणामुळे नागरिकांची धांदल उडाली.
दरम्यान, काही भागांमध्ये गारपीट झाल्याचीही माहिती समोर आली आहे. गारांच्या माऱ्यामुळे काही घरांच्या काचा फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतीपिकांबाबत शेतकरी चिंतेत पडले आहेत.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. (weather) शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातही वातावरणात अचानक बदल झाल्याचे दिसून आले आहे. जालन्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र अद्याप पावसाची नोंद झालेली नसली तरी वातावरणात झालेला बदल स्पष्टपणे जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?