अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाला (conflict) आज पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत. या संघर्षाचा परिणाम आता संपूर्ण जगावर दिसून येत आहे. विशेषतः ऊर्जा क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुज सामुद्रधुनीतून तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक तेलवाहू जहाजे या मार्गावर अडकून पडली असून जगभरात इंधन टंचाईची भीती निर्माण झाली आहे.

मात्र या गंभीर परिस्थितीत भारतासाठी काही दिलासादायक (conflict) घडामोडी समोर आल्या आहेत. शनिवारी भारताची दोन मोठी तेलवाहू जहाजे ‘शिवालिक’ आणि ‘नंदादेवी’ यांनी होर्मुजची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली आहे. या दोन्ही जहाजांमध्ये तब्बल ९२,७०० मेट्रिक टन एलपीजी गॅस असल्याची माहिती समोर आली आहे. ही जहाजे आता भारताच्या दिशेने रवाना झाली असून १६ ते १७ मार्चदरम्यान ती भारतात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशातील गॅस पुरवठ्याबाबत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती प्रदेशात (conflict) कार्यरत असलेल्या भारतीय खलाशांबाबतही दिलासादायक माहिती समोर आली आहे. जहाजवाहतूक मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागात अडकलेले सर्व भारतीय खलाशी सध्या सुरक्षित आहेत. गेल्या २४ तासांत त्यांच्यासोबत कोणतीही दुर्घटना घडलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गेल्या २४ तासांत आणखी ३० भारतीय खलाशांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुरक्षितपणे भारतात परतलेल्या खलाशांची संख्या २५३ वर पोहोचली आहे.
याचदरम्यान परराष्ट्र मंत्रालयानेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले (conflict) असल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वस्तू आणि ऊर्जा पुरवठा विनाअडथळा सुरू राहावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. देशात कुठेही इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
युद्धजन्य परिस्थितीतही (conflict) भारताला आणखी एक महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. इराणने होर्मुज सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना प्रवास करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील इराणच्या दूतावासाकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय जहाजांची वाहतूक सुरू राहण्यास मदत होणार आहे.
दरम्यान युद्धामुळे भारतात अडकून पडलेल्या इराणी नागरिकांनाही मदत करण्यात आली आहे. भारत सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करून येथे अडकलेल्या इराणी पर्यटकांना सुरक्षितपणे त्यांच्या देशात पाठवले आहे. या मानवीय मदतीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक होत आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठीही मोठी मोहीम राबवण्यात आली. आतापर्यंत सुमारे १ लाख ७२ हजार भारतीय नागरिकांची सुरक्षितपणे घरवापसी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भीषण युद्धाच्या छायेतही भारतासाठी काही दिलासादायक बातम्या समोर येत असल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?