Ghatkesar परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात (shocking incident) खळबळ उडाली आहे. लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून एका एचआयव्ही पॉझिटिव्ह तरुणाने तरुणीला एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचल्याचा आरोप समोर आला आहे. या अमानुष घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

ही घटना Hyderabad जवळील (shocking incident) घाटकेसरमधील Pocharam पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ मार्च रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मनोहर नावाच्या तरुणाचे संबंधित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते आणि दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र, नंतर तरुणीच्या कुटुंबीयांना समजले की मनोहर आणि त्याचे आई-वडील HIV/AIDSने संक्रमित आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
लग्न मोडल्यामुळे मनोहर संतप्त झाला होता. बदला घेण्याच्या (shocking incident) उद्देशाने त्याने थेट तरुणीच्या घरी जाऊन तिच्याशी जबरदस्ती केल्याचा आणि तिच्या शरीरात एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेनंतर तरुणीला अचानक ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती (shocking incident) समोर येताच परिसरात संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांवर कारवाईचा दबाव वाढला. अखेर पोलिसांनी शनिवारी, १४ मार्च रोजी मनोहरला अटक केली.
या प्रकारामुळे समाजात मोठी चर्चा सुरू झाली असून हा गुन्हा केवळ कायद्यानेच (shocking incident) नव्हे तर मानवतेच्या दृष्टीनेही अत्यंत गंभीर मानला जात आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?