प्रेम ही जगातली एक सर्वात गोड भावना मानली जाते पण प्रेम करणं फक्त महत्त्वाचं नाही तर प्रेम योग्य रित्या निभावनेही तितकेच महत्त्वाचे असते. आजकाल तरुण तरुणी फार पटकन प्रेमात(love) पडतात पण त्यातील फार कमी असे आहेत जे शेवटपर्यंत हे प्रेम टिकवून ठेवतात.

प्रेमात(love) विश्वास, काळजी, आपुलकी या सर्वच गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि जेव्हा या नात्यात या गोष्टींचा तुटवडा पडू लागतो तेव्हा हळूहळू ते नाते कमकुवत होऊ लागतं आपल्या प्रेमानेच आपला विश्वासघात केला आहे ही भावना आपल्या मनासाठी फार त्रासदायक ठरते आणि यातूनच मग अनावर होतो तो आपल्या मनातला राग, भावनांचा उद्रेक आणि हातावरचा ताबा… गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडलं आणि मग काय घडलं याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला कशी रंगेहाथ पकडते ते दिसून येते. घडतं असं की, मुलीचा बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलीसोबत डेटवर आलेला असतो आणि याची माहिती त्याच्या गर्लफ्रेंडला होते. मग काय बॉयफ्रेंडची खरडपट्टी काढण्यासाठी आणि त्याला अद्दल घडवण्यासाठी गर्लफ्रेंड देखील गुपचूप हॉटेलमध्ये पोहचते.

मुलाची प्रेयसी घटनास्थळी पोहोचताच, त्याला भीतीने घाम फुटतो. प्रियकराला असे दुसऱ्या मुलीसोबत पाहून प्रेयसीला राग अनावर होतो आणि ती लगोलग त्याच्या कानाखाली एक थप्पड मारते. या दरम्यान, ती तिच्या प्रियकराला वारंवार विचारत राहते की ती मुलगी कोण आहे आणि तो तिच्यासोबत काय करत आहे.

या संपूर्ण घटनेदरम्यान, दुसरी मुलगी देखील मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते पण प्रेयसीच्या रागाने इतके भयानक रूप घेतलेले असते की यातून मुलाची सुटका होणे कठीण होऊन बसते. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप समजले नसून सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे.

हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “याला पण गर्लफ्रेंड आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इथे आमच्याकडे एक नाय आणि भावासाठी दोन दोन मुली भांडत आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती त्याच्या आईसारखी दिसत आहे”.

हेही वाचा :

50 हजार कोटींच्या ‘लेटरबॉम्ब’ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

5 स्टार हॉटेलमध्ये रुम बुक करून 40 वर्षीय महिलेवर आमदाराकडून लैंगिक अत्याचा

ग्राहकांसाठी आनंदसरी! खिशाचा भार कमी होणार; सोन्याचा आजचा भाव किती ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *