मुंबई: आजचा सोन्याचा आणि चांदीचा दरात विशेष बदल जाणवत आहे. सोन्याच्या(gold) किमती आज वाढल्या आहेत. ही वाढ किंचीत जरी असली तरी किमती फार असल्याचे दिसत आहे. जसं जसे सणवार जवळ येत आहे सोनं महाग होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात श्रावण सुरु झाल्यापासूनच बदल पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किमतीत सतत बदल आता काही दिवस तसोच दिसण्याची शक्यता आहे कारण लागोपाठ येणार सणसमारंभ.

आज MCX वर सोन्याच्या किमतीत वाढ दिसली आहे. सोनं आज 50 रुपयांनी वाढलेले दिसत आहे. सोन्याचा ऑक्टोबर वायद्यची किमतही 99,410 रुपये आहे. आज 10 ग्रॅमनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर हा 92,350 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,07,750 रुपये आहे.

सराफा बाजारात सोन्याची(gold) किमत मात्र कमी झालेली दिसत आहं. सणाला सराफा बाजारातील दर कमी झालेले पाहून ग्राहक दुकानात तुंडुब गर्दी करताना दिसणार आहे. एक किलो चांदीची किमत ही 1,17,100 रुपये आहे. चांदीही 10 रुपयांनी वाढलेली पाहायला मिळाली.

सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, आयात शुल्क आणि कर, रुपया आणि डॉलरमधील विनिमय दर, मागणी आणि पुरवठ्याचा समतोल या आधारावर निश्चित केली जाते. भारतात सोन्याचा वापर केवळ गुंतवणुकीसाठीच नाही तर पारंपारिकपणे लग्न आणि सणांमध्ये देखील केला जातो, त्यामुळे किंमतीतील बदलाचा थेट परिणाम लोकांवर होतो.

22 कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहरआजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई92,350 रुपये92,750 रुपये
पुणे92,350 रुपये92,750 रुपये
नागपूर92,350 रुपये92,750 रुपये
कोल्हापूर92,350 रुपये92,750 रुपये
जळगाव92,350 रुपये92,750 रुपये
ठाणे92,350 रुपये92,750 रुपये


24 कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहरआजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई1,07,750 रुपये1,01,180 रुपये
पुणे1,07,750 रुपये1,01,180 रुपये
नागपूर1,07,750 रुपये1,01,180 रुपये
कोल्हापूर1,07,750 रुपये1,01,180 रुपये
जळगाव1,07,750 रुपये1,01,180 रुपये
ठाणे1,07,750 रुपये1,01,180 रुपये

हेही वाचा :

मोठी बातमी! पावसामुळे आज महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील शाळा बंद

50 हजार कोटींच्या ‘लेटरबॉम्ब’ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

5 स्टार हॉटेलमध्ये रुम बुक करून 40 वर्षीय महिलेवर आमदाराकडून लैंगिक अत्याचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *