कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : वसंत दादा पाटील यांचे सरकार कुटनितीचा(political updates) वापर करून शरद पवार यांनी पाडले, त्या राजकीय घटनेला जवळपास चार दशकांचा कालावधी लोटून गेला आहे. त्यानंतर”पाठीत खंजीर खुपसला”हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतक्या वेळेला वापरले गेले, उच्चारले गेले की, खंजीर आणि शरद पवार हे जोडशब्द बनले.

आपल्यावर होणाऱ्या या टिकेचा त्यांनी कधी प्रतिवाद केला नाही किंवा स्पष्ट खुलासा केला नाही. ही उपरोधिक आणि बोचरी टीका ते कायम झेलत राहिले. दोन दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात मात्र त्यांनी”होय वसंतदादांचे सरकार आम्ही पाडले”अशी पहिल्यांदाच जाहीरपणे कबुली दिली, मात्र त्यांनी या पाडापाडीच्या राजकारणात(political updates) माझ्याशिवाय आणखी काही जण होते. या पाठीत खुपसलेल्या खंजिरावर माझे एकट्याचे ठसे नव्हते असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे.
सुमारे चार दशकापूर्वी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक काँग्रेस आणि यशवंतराव चव्हाण वगैरे यांच्या नेतृत्वाखाली दुसरी काँग्रेस अशी तेव्हा राजकीय(political updates) स्थिती उद्भवलेली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती.
मात्र सत्ता हस्तगत करण्यासाठी या दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या होत्या आणि त्यानंतर बनलेल्या सरकारचे वसंत दादा पाटील हे मुख्यमंत्री बनले होते. या घटनेचा आम्हाला राग आला होता. आणि या रागातूनच वसंत दादा पाटील यांचे सरकार पाडण्याचा घाट आम्ही घातला होता. वसंत दादा पाटील यांचे सरकार पाडून माझ्या नेतृत्वाखाली सरकार बनले होते. एकूणच दादांचे सरकार पाडण्यात माझा पुढाकार होता असे त्यांनी पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात सांगून टाकले.
शरद पवार यांनी अशा प्रकारचा कबूलीनामा पहिल्यांदाच दिला आहे. सुमारे चार दशकापूर्वी घडलेल्या या राजकीय घटनेनंतर, शरद पवार यांना राजकीय खिंडीत गाठताना अनेक राजकारण्यांनी(political updates) “शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला”असे जाहीरपणे सांगण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर शरद पवार आणि खंजीर हे समीकरणच तेव्हा काही जणांनी बनवले होते.
वसंत दादा पाटील यांचे सरकार मी (आम्ही) पाडले याची जाहीरपणे सांगताना शरद पवार यांनी ती आपली तेव्हाची राजकीय चूक होती ही चूक मात्र कबूल केलेली नाही. बहुदा राजकारणात अशा काही गोष्टी क्षम्य असतात असे त्यांना म्हणायचे असावे.
वसंत दादा पाटील यांचे सरकार पाडल्यानंतरही वसंतदादांनी तो राग मनात ठेवलेला नव्हता. उलट त्यानंतर काही वर्षांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या विषयावर चर्चा सुरू असताना वसंतदादा पाटील यांनी माझे नाव घेतले.

मुख्यमंत्री पदाची शरद पवार(political updates) यांच्याकडे दिली तर ते पक्ष मजबूत करतील. त्यांच्यावर माझा विश्वास आहे असे सांगून पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी दादांनीच पुढाकार घेतला होता. ते फार मोठ्या मनाचे होते असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे. चार दशकापूर्वी आजच्यासारखे गढूळ राजकारण नव्हते. राजकीय सूड वगैरे शब्द तेव्हा राजकारणात वापरले जात नव्हते. एकूणच तेव्हाचे राजकारण सभ्य पातळीवरचे होते.
एकेकाळी वसंत दादा पाटील यांचे सरकार पाडणारे शरद पवार हे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकार कोसळले किंवा ते पाडले गेले तेव्हा मात्र त्यांनी संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात
किमान पातळीवर सभ्यता होती. तथापि 2019 मध्ये राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली तेव्हा मात्र ही सभ्यता गायब झाली.
फोडाफोडीच्या राजकारणाला उत आला. त्यातून निर्माण झालेला सत्ता संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. एकूणच आजच्या राजकारणात वसंतदादा पाटील यांच्यासारखे मोठ्या मनाचे राजकारणी नाहीत हे ठळकपणे पुढे आले आहे. या एकूण पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी जो कबुलीनामा दिला आहे, तो एका अर्थाने पाठीत खंजीर खुपसला या वाक्याला दुजोरा देणारा असला तरी, आता तरी ह्या चर्चेला पूर्णविराम मिळावा असा हेतू शरद पवार यांच्या कबुलीमध्ये दिसतो आहे हे मात्र निश्चित.
हेही वाचा :
‘या’ कारणामुळे शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर!
Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा
बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने कानाखाली मारली अन्… Video Viral