टेक जायंट कंपनीची आगामी आयफोन(iPhone) 17 सिरीजच्या लाँचिंगची तयारी सुरु झाली आहे. आयफोन 17 सिरीज लाँचसाठी सप्टेंबरमध्ये मोठ्या ईव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये केवळ आयफोन 17 सिरीजच नाही तर इतरही अनेक डिव्हाईस लाँच केले जाणार आहेत. आयफोन 17 सिरीजच्या लाँचिंगबाबत कंपनीकडून घोषणा देखील करण्यात आली आहे. त्यामुळे या सिरीजच्या लाँचिंगसाठी युजर्स प्रचंड उत्साही आहेत.

आयफोन 18 सिरीज अपडेट्स
जगभराय आयफोन (iPhone)17 सिरीजबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतानाच आता आयफोन 18 सिरीजबाबत अपडेट्स समोर येऊ लागले आहेत. आयफोन 18 सिरीजमध्ये कोणते मॉडेल्स लाँच केले जाणार आणि या सिरीजच्या लाँचिंगबाबत देखील काही अपडेट्स समोर येऊ लागले आहेत. आयफोन 17 सिरीज पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये लाँच केली जाणार आहे. मात्र आयफोन 18 सिरीज सप्टेंबरमध्ये लाँच केली जाणार नाही, अशी अपडेट समोर आली आहे.

आयफोन्स सप्टेंबर लाँचिंग
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे की, कंपनी 2027 मध्ये आयफोन 18 सिरीज लाँच करणार आहे. पण या सिरीजमधील सर्व मॉडेल्स सप्टेंबर महिन्यात लाँच केले जाणार आहेत. जर आतापर्यंत लाँच करण्यात आलेल्या आयफोनचा विचार केला तर बहुतेक आयफोन्स सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आले आहेत. त्यामुळे आयफोन 18 सिरीज देखील सप्टेंबरमध्येच लाँच होणार अशी अपेक्षा होती. मात्र आता यामध्ये एक बदल केला जाणार आहे.

आयफोन 18 सिरीज मॉडेल्स
मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅपल पुढील वर्षी iPhone 18 चे बेस मॉडल सप्टेंबरमध्ये लाँच करणार आहे. याऐवजी कंपनी त्यांचे पहिले फोल्डेबल मॉडेल लाँच करू शकते. रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, फोल्डेबल iPhone सह आयफोन 18 सिरीजमध्ये एकूण 5 डिव्हाईसचा समावेश असणार आहे. मात्र कंपनी हे सर्व मॉडेल्स एकाच वेळी लाँच करणार नाही. एवढ्या मोठ्या लाँचिंगपासून वाचण्यासाठी, कंपनी iPhone 18 चे बेस मॉडेल नंतर लाँच करू शकते. पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये, कंपनी iPhone 18 Air, iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि फोल्डेबल आयफोनची घोषणा करू शकते.

कधी लाँच होणार iPhone 18?
काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, कंपनी आयफोन 18 सिरीजमधील बेस मॉडेल आणि 18e हे 2027 च्या सुरुवातीला लाँच करू शकते. यामुळे ग्राहकांना महागडे आयफोन खरेदी करण्यापूर्वी फ्लॅगशिप लाइन-अप वापरून पाहण्यासाठी थोडा वेळ मिळेल. असे दिसून आले आहे की अ‍ॅपल सॅमसंगपेक्षा त्यांच्या डिव्हाइसेसची लहान लाइन-अप ठेवणे पसंत करते. या वर्षी, कंपनी iPhone 17 सीरीजमधील प्लस मॉडेल काढून 5.5mm पातळ iPhone 17 Air लाँच करणार आहे.

हेही वाचा :

50 हजार कोटींच्या ‘लेटरबॉम्ब’ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

5 स्टार हॉटेलमध्ये रुम बुक करून 40 वर्षीय महिलेवर आमदाराकडून लैंगिक अत्याचा

ग्राहकांसाठी आनंदसरी! खिशाचा भार कमी होणार; सोन्याचा आजचा भाव किती ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *