अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने (serious turn) आज १८व्या दिवशी अधिक भीषण वळण घेतल्याचं चित्र दिसत आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या या युद्धामुळे जागतिक पातळीवर तणावाचं वातावरण निर्माण झालं असून दोन्ही बाजूंनी हल्ले तीव्र झाले आहेत.

आज सकाळी इस्त्रायलने इराणमधील काही महत्त्वाच्या (serious turn) ठिकाणांवर मोठा एअर स्ट्राईक केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ नेते अली लारिजानी ठार झाल्याचं इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, इराणने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत लारिजानी सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या घटनेभोवती संभ्रम निर्माण झाला आहे.दरम्यान, इराणकडूनही प्रत्युत्तरादाखल हल्ले अधिक तीव्र करण्यात आले आहेत. इराणने अमेरिकाच्या मध्यपूर्वेतील सैन्य तळांवर मिसाईल डागल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे काही सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात असून अमेरिकेचं मोठं नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे.

याचबरोबर इराणने (serious turn) इस्त्रायलवरही सतत मिसाईल हल्ले सुरू ठेवले आहेत. इस्त्रायलमधील अनेक शहरांमध्ये सायरन वाजत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काही महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याने पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. इराणने तर इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयालाही लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.या वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकामध्ये राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर आणि दहशतवादविरोधी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी जोसेफ केंट यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

जोसेफ केंट यांनी आपल्या राजीनाम्यामागे ट्रम्प प्रशासनाच्या युद्धनीतीवर तीव्र (serious turn) नाराजी व्यक्त केली आहे. इराणकडून थेट धोका नसताना युद्ध छेडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. युद्धाच्या काळात इतक्या महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्याने अचानक राजीनामा दिल्याने अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.एकीकडे युद्ध तीव्र होत असताना आणि दुसरीकडे अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात अस्थिरता निर्माण होत असल्याने या संघर्षाचं पुढील चित्र अधिकच गुंतागुंतीचं होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर या युद्धाकडे गंभीरपणे पाहिलं जात असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *