WhatsApp हे आजच्या काळात प्रत्येकाच्या मोबाइलमधील (essential app) अत्यावश्यक अॅप बनलं आहे. दैनंदिन संवादापासून ते महत्वाचे फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रं शेअर करण्यापर्यंत या अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. युजर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी कंपनी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते आणि यावर्षीही अनेक अपडेट्सनंतर आता एक वेगळंच फीचर चर्चेत आलं आहे.

‘Guest Chats’ नावाचं हे नवीन (essential app) फीचर युजर्ससाठी खास ठरणार आहे. या सुविधेमुळे आता ज्या व्यक्तीकडे व्हॉट्सअॅप अकाउंट नाही, त्याच्याशीही सहज संवाद साधणं शक्य होणार आहे. म्हणजेच, अॅप डाउनलोड न करताही चॅटिंग करण्याचा मार्ग आता खुला होणार आहे.
या फीचरची माहिती सर्वप्रथम WABetaInfo यांनी दिली आहे. त्यांच्या अहवालानुसार, (essential app) सध्या हे फीचर Android आणि iOS च्या काही बीटा युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. या फीचरअंतर्गत युजर्सना एक खास इन्वाइट लिंक तयार करता येते, जी ‘Invite a friend’ या सेक्शनमधून जनरेट केली जाते. ही लिंक SMS, ईमेल किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे शेअर करता येते.
ही लिंक मिळाल्यानंतर (essential app) समोरची व्यक्ती ती आपल्या मोबाईल किंवा संगणकाच्या ब्राउजरमध्ये उघडू शकते. त्यानंतर त्या व्यक्तीला व्हॉट्सअॅप डाउनलोड करण्याचा किंवा ‘गेस्ट’ म्हणून चॅट सुरू ठेवण्याचा पर्याय दिला जातो. गेस्ट पर्याय निवडल्यास संभाषण थेट WhatsApp Web च्या माध्यमातून सुरू होतं.या फीचरमुळे व्हॉट्सअॅपचा वापर अधिक सोपा आणि सर्वसमावेशक होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांच्याकडे अॅप नाही किंवा ते वापरत नाहीत, त्यांच्याशी संवाद साधणं आता अधिक सोयीचं होणार आहे.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज